पत्रकार मयुर पालवणकर
मुरुड : किल्ले रायगडच्या विकासासंदर्भात महाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट भूमिका मांडली. अन्यत्र कोणत्याही विषयावर राजकारण करीन, मात्र रायगडच्या बाबतीत कधीही राजकारण करणार नाही, असे ते ठामपणे म्हणाले. शासकीय विश्रामगृह महाड येथे त्यांनी रायगडसंबंधी प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांवर संवाद साधला...
