महाराष्ट्र वेदभुमी

उठ मराठ्या जागा हो, मुंबई आपली आहे आपली,

 

इथे आवाज फक्त आपलाच - बाळासाहेब ठाकरे

 कांतीलाल पाटील :  महाराष्ट्र वेदभूमी

मुंबई नंतर संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर मराठी सोबत इतर भाषकांची संख्या ही मुंबईत वाढत होती. मुंबईत उद्योग उदयास आले  असले तरी, त्यांच्या चाव्या या अमराठी लोकांच्या हातात होत्या.मराठी माणसाला दुय्य्यम स्थान मिळत होते. व्यापारात गुजराती मारवाडी दक्षिण भारतीय यांना प्राधान्य होते. मराठी लोकांना अन्याय होत होता...

१९६० च्या दशकात मुंबईवर दक्षिण भारतीयांचा कब्जा होता. दक्षिण भारतीय विरुद्ध मराठी माणूस असे विरोधी वातावरण होते.दक्षिण भारतीयांचा बोलबाला मुंबईवर होता. कारण सर्वच कार्यालयात दक्षिण भारतीयची संख्या जास्त होती.त्यावेळी मराठी माणसाचा राग वाढू लागला की, त्यांचा हक्क त्यांना मिळत नाही. मराठी माणसाच्या या संघर्षाची सुरुवात झाली. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाना समजावले की, महाराष्ट्र सर्वात आधी पहिला अधिकारा मराठी माणसाचा आहे.आणि तो अधिकार त्यांना मिळाला पाहिजे. हि    गोष्ट  संपूर्ण महाराष्ट्रात पसरण्यासाठी सन १९६३ साली मराठी साप्ताहिक मार्मिक ची सुरुवात त्यांनी केली. या साप्ताहिक मार्मिक ने मराठी माणसावर होणारे अन्याय, अत्याचार आणि नोकरी विषयी आवाज उठवायला सुरुवात केली...

फार कमी वेळात साप्ताहिक मार्मिक संपूर्ण महाराष्ट्र प्रसिद्ध झाला. मराठी माणसांना जेव्हा समजले की, कोणी आहे, जो आपल्या न्याय हक्कासाठी लढतोय. तेव्हा मराठी माणसाने बाळासाहेब ठाकरेच्या भाषणाची दाखल घेतली. आणि मार्मिकच्या कार्यालयात लोकांची गर्दी वाढू लागली...

आता बाळासाहेब ठाकरे यांना लोकांचा पाठीबा मिळत होता. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी  एक संघटना असली पाहिजे. आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, भूमिपुत्राचा नारा देत शिवसेनेची स्थापना झाली. बाळासाहेब ठाकरे यांनी दक्षिण भारतीय विरुध्द नारा दिला,” बजाव पुंगी, हटाव लुंगी.” त्यावेळी दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय यांना मारायला मराठी माणसाने सुरुवात केली. आणि इथूनच परप्रांतीविरुद्ध संघर्षाला सुरुवात झाली. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी  सर्व परप्रांतीयांना ठणकावून सांगितले,

“मुंबई आमची आहे आमची , इथे आवाज फक्त आमचाच“

Post a Comment

Previous Post Next Post