महाराष्ट्र वेदभुमी

खा निलेश लंके यांची किहीम.सरपंच पिंट्या गायकवाड यांच्या निवासस्थानी भेट,


खासदार निलेश लंके यांनी किहीम समुद्रकिनारी घेतला ई बाईक चालविण्याचा आनंद

सोगाव - अब्दुल सोगावकर : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी (शरद पवार गट) काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय खासदार निलेश लंके यांनी रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील किहीम ग्रामपंचायतीचे सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांच्या निवासस्थानी सोमवार दि. ७ जुलै २०२५ रोजी सदिच्छा भेट दिली...

    यावेळी खासदार लंके यांचे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक सुधीर उर्फ बाळू गायकवाड, सुप्रिया सुधीर गायकवाड, सरपंच पिंट्या गायकवाड, सासवणे ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या हर्षला पाटील, चोंढी- बामणसुरे पोलीस पाटील प्रीती गायकवाड, आसिफ मलिक, नदीम आत्तार, भारत मेनकुदळे, महेश नाईक, निलेश उतेकर, सुदेश सावंत आदी मान्यवर व पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच खासदार निलेश लंके यांचे अनेक सहकारी देखील यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते...

    लोकप्रिय खासदार निलेश लंके यांनी गायकवाड कुटुंबियांसोबत भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर दिलखुलास व मनमोकळ्या स्वरूपात चर्चा करत सरपंच पिंट्या गायकवाड यांच्या सामाजिक कार्याची माहिती घेऊन त्यांचे कौतुक केले.

    यादरम्यान पत्रकारांसोबत चर्चा करताना सामाजिक कार्यकर्ते तथा किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांच्या बद्दल तुमचे मत काय आहे ? असे विचारले असता त्यांनी सांगितले की, आपल्या अलिबाग तालुक्यातील आपल्या भागातील तळागाळातील सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे, कार्यकर्त्यांच्या समस्या त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी धडपड करणारा असा आमचा जिवाभावाचा सहकारी म्हणून आम्हाला एक त्यांचा अभिमान वाटतो. कोरोना काळात त्यांनी प्रत्येक कुटुंबाला आपल्या कुटुंबाप्रमाणे सर्व प्रकारची सेवा देण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे, या बद्दल त्यांचा व त्यांच्या सामाजिक बांधिलकी असणाऱ्या या परिवाराबद्दल आम्हाला अभिमान व गर्व वाटतो की या परिवाराला एक सामाजिक चळवळीचा वारसा आहे, या परिवारातील सासवणे ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या हर्षला पाटील ताई या सुद्धा आपल्या भागात चांगले कार्य करीत आहेत, त्यांचेही कौतुक वाटले, एकंदरीत आम्ही या सामाजिक वारसा जपणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याच्या या भागात राजकीय व सामाजिक कार्याच्या निमित्ताने आल्यानंतर आपल्या जिवाभावाच्या सहकाऱ्याच्या घरी गेलेच पाहिजे म्हणून आज आम्ही इथे आलो आहे, असे सांगितले. तसेच यावेळी पत्रकार यांनी यावेळी उद्धव ठाकरे व राज ठाकरे असे ठाकरे कुटुंब आज एकत्र येत आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटते ? असे विचारले असता, त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, ठाकरे कुटुंब आज एकत्र येत आहेत, हे खूप चांगलेच आहे, कुठल्याही कुटुंबात राजकीय मतभेद नाही झाले पाहिजे या विचारांचा मी आहे, कुटुंब हे अखंडित व एकसंघ राहिले पाहिजे, ५ जुलै रोजी ठाकरे कुटुंब एकत्र आले हे समाधानकारक चित्र असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले....

   यावेळी त्यांनी नयनरम्य किहीम समुद्रकिनारी भेट दिली. यादरम्यान त्यांनी समुद्रकिनारी असणाऱ्या ई बाईक चालविण्याचा मोह आवरता आला नाही, तेथील ई बाईक चालविण्याचा आनंद घेतला. तसेच किहीम समुद्रकिनारी मिळणाऱ्या नारळपाणीचा आस्वाद घेतला. यानंतर कोकण विभाग प्रशासकीय प्रतिनिधी गुरुपीठ चे डॉ. किरण शेट्ये यांच्या बामणसुरे येथील दंतावर वैद्यकीय उपचार करण्यात येत असलेल्या दवाखान्याला सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या...

फोटो लाईन :

 पहिल्या चित्रात -  अहमदनगर दक्षिण जिल्ह्यातील लोकप्रिय खासदार निलेश लंके यांनी किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांच्या चोंढी येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली असता त्यांचे स्वागत  पिंट्या गायकवाड व उपस्थित इतर मान्यवर,

दुसऱ्या चित्रात : खासदार निलेश लंके यांनी किहीम समुद्रकिनारी ई बाईकचा आनंद घेताना,

Post a Comment

Previous Post Next Post