कांतीलाल पाटील : महाराष्ट्र वेदभूमी वृत्तपत्र सेवा
पनवेल - दि. ०८: ०८ जुलै २०२५ रोजी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे रायगड जिल्हा सहसचिव तसेच शिवधर्म वृत्तपत्राचे उपसंपादक महेंद्र माघाडे यांचा वाढदिवस पनवेल येथे शासकीय विश्रामगृहात जल्लोषात साजरा करण्यात आला... कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी होते... राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब आढांगळे यांच्या हस्ते महेंद्र माघाडे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला...
या वेळी उपस्थित असलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी माघाडे यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे आणि संघासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे गौरवपूर्वक उल्लेख केले...राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब आढांगळे यांनी सांगितले की, महेंद्र माघाडे हे हसमुख, बहुगुणी व्यक्तिमत्व असून, डिजिटल बॅनर तयार करण्यात तरबेज आहेत... संघाचे नाव अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत... प्रत्येक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो, म्हणून संघात त्यांचे विशेष स्थान आहे...
संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी म्हणाले की, संघाला हिऱ्यासारखी माणसं मिळाली आणि महेंद्र माघाडे हे त्यापैकीच एक आहेत. माघाडे यांची खासियत म्हणजे संघात नवीन लोकांना जोडण्यासाठी ते नेहमीच सक्रिय असतात... त्यांच्या कार्यपद्धतीचे इतर पदाधिकाऱ्यांनी अनुकरण करावे, असे आवाहनही त्यांनी केले...
कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब आढांगळे, अन्याय अत्याचार निवारण समितीचे राज्य सचिव प्रितम चौहाण, जिल्हा सचिव राजपाल शेगोकार, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गायकवाड, जिल्हा संघटक उमाजी मंडले, ठाणे जिल्हाध्यक्ष श्रावण पाटील, खालापूर तालुका अध्यक्ष बाळाराम सावंत, रायगड जिल्हा अध्यक्षा अश्विनी ठाकूर, पत्रकार निलेश जाधव, पत्रकार विनोद देशमुख तसेच समितीच्या नवनिर्वाचित पदाधिकारी आशा ढसाळ आणि प्रिया उपासनी आदी मान्यवर उपस्थित होते... या सर्व मान्यवरांनी महेंद्र माघाडे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या...
