महाराष्ट्र वेदभुमी

अपघाताचा धोका वाढलाय?नम्रता ढाबा ते गारभट रस्ता झाडाझुडपात हरवलाय,


विद्यार्थी, प्रवाशी, नागरिकांच्या जिवाला धोका,

 पुगांव रोहा(नंदकुमार कळमकर): मुंबई-गोवा महामार्ग ६६ वरून पुगांव नम्रता ढाबा ते गारभटकडे जाणाऱ्या मार्गांवरील रस्त्याच्या दोन्ही बाजूला असंख्य ठिकाणी झाडे झुडपे वाढली असुन प्रचंड वाढलेल्या झाडांमुळे जणू रस्ताच हरवला असल्याचे चित्र पहावायस मिळत आहे यामुळे यामार्गांवरून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसह प्रवासी नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झालाय... 

नम्रता ढाबा ते गारभट मार्गावर पुगांव, मढाळी, डोळवहाल, ऐनवहाल, रेवेचीवाडी, गारभट, विठ्ठलवाडी, राजखलाटी, बल्हे, कांदला, अशी असंख्य गावे असुन या मार्गांवरून शाळेतील येजा करणारे विद्यार्थी, कोलाड-खांबकडे बाजारपेठेत येणारे नागरिक, दुध विक्रेते तसेच धाटाव एम.आय.डी.सी कडे कामावर जाणारे कामगार याच मार्गांवरून येजा करीत असतात... परंतु हा मार्ग झाडांझुडपाणी वेढालेला आहे...शिवाय या मार्गाला असणारी वेढी वाकडी वळणे तसेच आजूबाजूला असणारे जंगल यामुळे समोरून येणारी वाहने दिसत नसल्यामुळे या मार्गावर मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असुन सार्वजनिक बांधकाम खाते यांनी लक्ष देऊन प्रचंड वाढलेली झाडेझूडपे तोडण्यात यावी अशी मागणी या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशी नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे...

  सद्या पावसाळा जोरदार सुरु असुन या मार्गावर असणारा धबधब्यावर मौज मजा करण्यासाठी तसेच पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी असंख्य पर्यटक या मार्गांवरून येजा करीत आहेत... यामुळे या मार्गांवर वाहतुकीचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येत आहे... या नवीन येणाऱ्या पर्यटकांना या रस्त्याचा अंदाज येत नसल्यामुळे अपघात होण्याचा धोका अधिकच वाढला आहे...

   प्रतिक्रिया

   हा रस्ता पुगांव नम्रता ढाबा ते गारभट दिघेवाडी मार्गी सुधागड पाली कडे गेला असुन या मार्गांवरून असंख्य प्रवाशी येजा करीत असतात परंतु रस्त्याला वाढलेल्या प्रचंड  झाडे झूडपे यामुळे समोरून येणारी वाहने दिसत नसल्याने या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांची तारांबल उडत असुन या मार्गांवर वाढलेली प्रचंड झाडे झूडपे संबंधितांकडून तोडण्यात येऊन रस्ता मोकळा करावाव- : सुरेश धामणसे, सामाजिक कार्यकर्ते, डोळवहाल

Post a Comment

Previous Post Next Post