महाराष्ट्र वेदभुमी

चाणजे येथे चारसूत्र पद्धतीने भात लागवड

उरण दि २१(विठ्ठल ममताबादे): दिनांक २१ जुलै २०२५ रोजी मौजे. चाणजे, तालुका उरण येथे श्रीम.भरती उमेश म्हात्रे यांच्या शेतावर श्रीम.अर्चना सुळ नारनवर तालुका कृषी अधिकारी उरण यांनी शेतात उतरून आत्मा अंतर्गत रत्नागिरी ८ या वाणाचे चारसूत्री पद्धतीने भात लागवड केली.यावेळी त्यांनी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना चारसूत्री भात लागवड पद्धतीमुळे  लागणारा खर्च बचत, उत्पादन वाढ तसेच चारसूत्री भात लागवडीच्या प्रत्येक सूत्रांबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी अधिकारी गटकळ , मकृअ, श्रीम.बुरकुल , उप कृ अधिकारी श्रीम.अदीका पानसरे, स.कृ.अधिकारी श्रीम.नमिता वाकळे, बी.टी.एम उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post