कोलाड (श्याम लोखंडे):- रायगड जिल्ह्यसह सबंध देशभरात गोविंदा उत्सव अथवा दहीहंडी उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तसेच महाराष्ट्रातसह मुंबई येथील दहिहंडी उत्सवात एकावर एक थर लावण्यासाठी असंख्ये गोविंदा पथक सहभाग घेतात तसेच रायगड जिल्ह्यात विविध ठीक ठिकाणी मानाच्या दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी येथील गोविंदा पथक भाग घेत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतात.. या अनुषंगाने जिल्ह्यात हा उत्सव मोठ्या आनंदाने तसेच तो कायदा सुव्यवस्थेचे पालन करून साजरा करण्यात यावा त्याच बरोबर गोविंदा पथकातील गोविंदा तथा बाल गोपाल यांच्या रक्षणार्थ या असोसिएशनची स्थापना करण्यात आली असून जिल्हा असोसिएशन अध्यक्षपदी कुणाल मोर्ले यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे...
गोविंदा आला रे आला, गोकुळात आनंद झाला...! गोविंदा उत्सवासाठी गोविंदा पथकांची लगबग सुरु झाल्याचे पहावयास मिळत आहे तर सर्वत्र सराव प्रशिक्षण गोविंदाला देण्याचे काम स्थानिक पातळीवर गाव मंडळी युवामंडळ यांच्याकडून केला जात आहे...यासाठी रायगड जिल्हा गोविंदा असोसिएशन शासन नोंदणी क्र. रायगड / ००००१२०/२०२५ करण्यात आली आहे...
रायगड जिल्हा गोविंदा असोसिएशन अध्यक्ष Crazy मोर्ले,उपाध्यक्ष जितेश कृष्णा भोईर,कार्याध्यक्ष प्रमोद दिनाभाऊ जांबेकर,सचिव संतोष कृष्णा भोईर सहसचिव शुभम नरेश पाटील,खजिनदारप्रसाद प्रभाकर गोतावडे,सहखजिनदार रोहन संतोष तांबे,सदस्य योगेश रघुनाथ मोरे,संजय मनोहर पोईलकर,कौस्तुभ अशोक देवळेकर, अनघा मिलिंद खोत,सह जिल्ह्यातील हौशी आणि कर्तबगार सामाजिक कार्यकर्ते यांची या असोसिएशन च्या संचालक मंडळावर निवड करण्यात आली आहे...
