महाराष्ट्र वेदभुमी

अलिबागच्या राजकारणात नवे नेतृत्व उदयास..!


निलेश मलबारी यांची ‘शिवसेना अलिबाग शहर संघटक’ पदी भव्य नियुक्ती

अलिबाग (प्रतिनिधी): हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे निष्ठेने पालन करत, उपमुख्यमंत्री मा.ना. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व रायगड जिल्हा प्रमुख श्री. राजा केणी यांच्या शिफारशीने निलेश विजय मलबारी यांची ‘शिवसेना अलिबाग शहर संघटक’ म्हणून अत्यंत महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आलीय...

 एक वर्षाचा कार्यकाल देण्यात आलेला असून, या कालावधीत निलेश मलबारी यांच्याकडून शिवसेनेची संघटना अधिक मजबूत करणे, नव्या कार्यकर्त्यांना एकत्र आणणे आणि पक्षवाढीसाठी अलिबागमध्ये सक्रिय भूमिका बजावणे अपेक्षित आहे...

 मलबारी यांच्या सामाजिक कार्याचा व तरुणांमध्ये असलेल्या प्रभावाचा विचार करून ही नियुक्ती झाल्याचे सांगण्यात येत आहे... पक्षाच्या विचारसरणीला मार्गदर्शक ठरणाऱ्या या निर्णयामुळे अलिबाग शहरात नवचैतन्याची लाट निर्माण झाली आहे...

Post a Comment

Previous Post Next Post