कांतीलाल पाटील : महाराष्ट्र वेदभूमी
पेण-: दि.१७ : मंगळवारी बैठक घेण्यात येईल व तोपर्यंत दुरशेत रस्त्यावरून अवजड वाहतूक बंद राहील उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांचे आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित...
मागील २ वर्षांपासून पेण तालुक्यातील दुरशेत ग्रामस्थ अवजड वाहनांच्या वाहतुकीच्या दहशतीखाली वावरत असताना वारंवार प्रशासनाला विनंत्या-अर्ज करुन देखील प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेचा निषेध आणि भयमुक्त रस्त्याच्या मागणीसाठी दुरशेत ग्रामस्थांनी मागील महिन्यात दुरशेत फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले... त्यावेळी तहसीलदार पेण यांनी दुरशेत ग्रामस्थांच्या सर्व मागण्या मान्य पुढील पंधरा दिवसात दगड खान मालकांना त्यांच्या स्वतंत्र रस्ता बनवण्यासंबंधीची पत्र काढले परंतु एक महिना उलटूनही पर्यायी रस्त्याच्या कामाला सुर्वात करण्यात आली नाही... याउलट ग्रामस्थांना विश्वासात न घेता बाळगंगा नदीत जे एस डब्ल्यू चा प्रदूषणकारी स्लॅगचा भराव भराव करून आधीच पूरग्रस्त असलेल्या दुरशेत गावाला दगडखान मालकांकडून पाण्यात बुडवण्याचा प्रयत्न होत असताना तहसीलदार किंवा महसूल अधिकाऱ्यांच्या विरोधात दुरशेत फाट्यावर मुला-बाळांसह बाळगंगा नदीत पाण्यात उतरून दिनांक १७ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता सामूहिक जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला... यावेळी खबरदारी म्हणून मोठा पोलीस फौजफाटा होता...
