महाराष्ट्र वेदभुमी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा वाद चिघळणार

सर्वपक्षीय कृती समितीचा राज्य आणि  केंद्र सरकारला  अंतिम इशारा

कांतीलाल पाटील :  महाराष्ट्र वेदभूमी 

पनवेल -: दि.१७ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनासाठी आता सप्टेंबरचा मुहूर्त निश्चित केला आहे... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच गेल्या आठवड्यात ही घोषणा केली आहे... असे असले तरी विमानतळाच्या नामकारणाबाबत त्यांनी कोणतेही स्पष्ट संकेत न दिल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे...या पार्श्वभूमीवर विमानतळ नामकरण संघर्ष समितीने आता निर्णायक लढ्याची हाक दिली आहे... त्यामुळे या मुद्यावर पुढील काही दिवसांत संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे...

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दिवगंत नेते दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे, यासाठी समस्त प्रकल्पग्रस्त एकवटले आहेत... या मागणीसाठी मागील काही वर्षापासून सातत्याने आंदोलने केली जात आहेत... विशेष म्हणजे राज्य शासनाने नामकरणाचा ठराव करून तो अंतिम मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठविला आहे... दोन वेळा प्रस्ताव पाठवूनही केंद्राने प्रश्न प्रलंबित ठेवल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजीचा सुर आहे... यातच आता विमानतळाच्या उद्घाटनाची घटिका  समीप आली आहे... १२ जुलै रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विमानतळ प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेऊन सप्टेंबरमध्ये विमानतळाचे लोकार्पण करण्याचे संकेत दिले आहेत... तर नामकरणाच्या मुद्यावर केंद्राकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासित केले आहे...तत्पूर्वी म्हणजेच २ जुलै रोजी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत झालेली बैठकही निष्फळ ठरली आहे...त्यामुळे उद्घाटनापूर्वी विमानतळाच्या नामकरणाची घोषणा करा, अशी मागणी आता कृती समितीने लावून धरली आहे...

प्रतिक्रिया

१७ सप्टेंबर रोजी विमानतळाचे उद्घाटन करण्याच्या हलचाली सुरू आहेत... त्याअगोदर नामकरणाची घोषणा झाली पाहिजे... त्यादृष्टीने आठ दिवस अगोदरच अधिसूचना काढा... नंतर काढतो असे चालणार नाही.. अन्यथा उद्घाटनाच्या दिवशी विमानतळाच्या दोन्ही बाजूंनी प्रकल्पग्रस्त धडकतील... तत्पूर्वी पुढील आठ दहा दिवसांत समन्वय समितीची बैठक घेऊन आंदोलनाची रूपरेषा निश्चित केली जाणार आहे. त्यानंतर आजी-माजी खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याचे नियोजन आहे. शेवटच्या टप्प्यात आश्वासन नको, कृती हवी आहे...दशरथ पाटील, अध्यक्ष, सर्वपक्षीय कृती समिती.. 

उद्घाटनापूर्वी लवकरात लवकर नोटिफिकेशन काढावी आणि लोकांच्या मनातला गोंधळ नष्ट करावा. महाराष्ट्र शासनाचा ठराव जाऊन तीन वर्षे झाली येत्या 27 जुलैला तीन वर्षे पूर्ण होतील...कॉम्रेड कामगार नेते भूषण पाटील..

Post a Comment

Previous Post Next Post