महाराष्ट्र वेदभुमी

मुंबईमध्ये मराठी न बोलण्याच्या वादातून मनसे कार्यकर्त्यानी दुकानदाराला केली मारहाण

मनसे कार्यकर्ते वर गुन्हा दाखल.

 व्यापारांनी ०३ जुलै रोजी मीरा भाईंदर येथे दुकाने आणि शहर  बंद ठेऊन केला निषेद.

कांतीलाल पाटील:  महाराष्ट्र  वेदभूमी

मिरा रोड, मुंबई दि.३ : राज ठाकरे यांच्या मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई येथील मीरा-रोड मधील एका दुकानदाराच्या कानाखाली मारली... कारण त्याला मराठी बोलता येत नव्हते... 

मुंबई येथील मिरा रोड या परिसरातील मिठाईच्या दुकानात मनसे कार्यकर्ते गेले... त्यांनी पाण्याची बॉटल मागितली... दुकानांमध्ये काम करणाऱ्या तरुणाने विचारले, छोटा बॉटल चाहिये या बडा बॉटल... त्यावेळी मनसे कार्यकर्ते रागावले आणि त्यांनी त्या तरुणाला  सांगितले, मराठीत बोल... विषय वाढला आणि मनसे कार्यकर्त्यांनी शिव्या द्यायला सुरुवात केली... त्यांनतर मनसे कार्यकर्ते दुकानाच्या मालकाकडे गेले आणि त्यांनी त्या दुकानदाराला सांगितले, इथे राहायचं आहे... दुकान चालावाचे आहे, तर मराठीच बोलावे लागेल... महाराष्ट्रमध्ये मराठी बोलना कंपल्सरी आहे...

दुकानदार ने कहा, महाराष्ट्र मे तो सब भाषा चलती है...यावर  मनसे कार्यकर्त्यांना राग आला आणि त्यांनी त्या दुकानदाराला शिवीगाळ आणि मारहाण केली...

मनसे कार्यकर्ते मारहाण  करून निघून गेले... त्यानंतर दुकानदार पोलीस स्टेशनला गेला... घडलेली घटना पोलिसांना सांगितली... पोलिसांनी मनसे कार्यकर्ते वर गुन्हा दाखल केला...मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, जे महाराष्ट्रमध्ये राहून मराठी बोलणार नाहीत, त्यांना आम्ही असाच धडा शिकवू...

मुंबई येथील मिरा रोड मधील दुकानदाराला मारून प्रकरणामुळे व्यापारामध्ये संताप उसळलेला असून मीरा-भाईंदर येथे ०३ जुलै रोजी सर्व व्यापारानी दुकाने तसेच शहर बंद ठेवून निषेद व्यक्त केला आहे...

व्यवसायाला संरक्षण द्या, आम्हाला संरक्षण द्या... अशी मागणी करत व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले... त्यात महिलांचाही  सहभाग होता...  पोलीस उपायुक्तांनी सदर प्रकरणाची दखल घेतली असून,  आरोपिवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन  व्यापाऱ्यांना दिले...

Post a Comment

Previous Post Next Post