सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक:- तालुक्यातील मौजा लोधा (पिंडकेपार) येथे वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेले स्व. बालकरामजी ढोबळे यांच्या कुटुंबियांची माजी मंत्री मा. राजेंद्रजी मुळक सांत्वनपर भेट घेतली. स्व. बालकरामजी ढोबळे यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे. या दुःखातून सावरण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. त्याचबरोबर या भागातील वाघांचे दिवसेंदिवस वाढणारे हल्ले लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले. व त्याना काहिशी आर्थिक मदतही केली. यावेळी जिल्हा परीषदेच्या माजी सदस्या शांता कुमरे, कैलास राउत, माजी पंचायत समिती सदस्या महेश मडावी, यशोदाताई ढोबळे, सरपंच विलास उईके करवाहीचे सरपंच रंजीत कोकोडे, पोलीस पाटील पंचफुला मर्सकोल्हे, हरीशकुमार गुप्ता, कैलाश निघोट, यशपाल ढोबळे, कमलेश केवटे, विशाल घंगारे, देवीप्रसाद रंगडाले, विनोद ढोबळे, अशोक ढोबळे, दीपचंद मरसकोल्हे व कुटुंबीय आदी उपस्थीत होते...
