रोहा रायगड प्रतिनिधी. दीप वायडेकर
रायगड जिल्ह्यात रोहा तालुक्यातील ग्रुप ग्राम पंचायत वरसे ही जिल्ह्यातील अग्रगण्य आणि बलाढ्य ग्राम पंचायत आहे, गेले कित्येक दशका पासून ही ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मधुकर पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कडे राहिली आहे. विद्यमान महिला आणि बालविकास मंत्री तथा आमदार कु आदिती ताई वरदा सुनिल तटकरे यांच्या राजकीय कार्यकिर्दीची सुरवात सुद्धा ह्याच जिल्ह्या परिषद गणातून झालेली आणि त्या मध्ये त्यांनी खणखणून यश संपादन केलेलं म्हणून ही ग्रामपंचायत तालुक्यात खा सुनिल तटकरेंचा बालेकिल्ला म्हणून सुद्धा उल्लेखली जाते.
दि ३ जुलै रोजी ग्रुप ग्रामपंचायत वरसे येथे उपसरपंच पदासाठी पोट निवडणूक पार पाडण्यात आली ह्या मध्ये उपसरपंच पदी सौ मयुरी आतेश पडवळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उपसरपंच पदी महिला रुजू झाल्याने सार्वत्रिक रित्या शुभेच्छांचा वर्षाव होत असून ग्रामपंचायत हद्दीतील महिलांचे प्रश्न अधिक वेगाने सोडवले जातील असे सागण्यात येते आहे...
या प्रसंगी नवनिर्वाचित उपसरपंचाना शुभेच्छा देतांना ग्राम पंचायतीचे सर्वेसर्वा तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच श्री रामा शेठ म्हात्रे, माजी सरपंच अमित मोहिते,नरेश पाटील ग्रामसेवक श्री दत्तात्रय सावंत, मराठी उद्योजक रामचंद्र नाकती,गणेश शिवलकर, माजी उपसरपंच विद्यमान सदस्य शांतिशील तांबे,मामा सुर्वे, आदी सदस्य महिला भगिनी उपस्थित होते...
