महाराष्ट्र वेदभुमी

रोहा पोलीसांकडून न्यू इंग्लिश स्कूल चणेरे विद्यालयात जनजागृती मोहिम


लैंगिक शोषण,सायबर फ्रॉड,व्यसनाधीनता व आरोग्य विषयक मार्गदर्शन...

शहानवाज मुकादम रोहा: रोहा तालुक्यातील (दि:03/07/2025) न्यू इंग्लिश स्कूल चणेरे विद्यालयात रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री मारूती पाटील यांच्या मार्गदर्शनात रोहा पोलीसांकडून जनजागृती मोहिमे अंतर्गत- समाजात वाढत आसलेली गुन्हेगारी, लहान मुला-मुलींचे लैंगिक शोषण, सायबर फ्रॉड, वाढत चाललेली व्यसनाधीनता त्याचबरोबर आरोग्य विषयक सल्ले यासारख्या विषयांवर व्याख्याने आयोजित करण्यात आले...

प्रमुख पाहुणे व अतिथी मान्यवरांकडून विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले...कार्यक्रमाचे अध्यक्ष - श्री प्राचार्य डॉक्टर अतुल हंसराज साळुंखे  ( सी. डी. देशमुख कॉलेज रोहा )यांनी- बालकांचे लैंगिक शोषण, व्यसनाधीनता, बाल गुन्हेगारी यावर अध्यक्षीय मार्गदर्शन केले...

मार्गदर्शक- सौ. सुनंदा पाटील  सहाय्यक शिक्षिका मेहेंदळे हायस्कूल रोहा यांनी- मोबाईल, सोशल मीडिया यांचा अतिवापर यावर मार्गदर्शन केले...चणेरा बीटचे इन्चार्ज- रोहा पोलीस हवालदार श्री नरेश मोरे यांनी ऑनलाइन फ्रॉड  या विषयावर मनोगत व्यक्त केले...रोहा पोलीस हवालदार श्री सुनील सकपाळ यांनी व्यसनाधीनता या विषयावर मार्गदर्शन केले...

 रोहा पोलीस महिला हवालदार  सौ निलिशा पेढवी मॅडम यांनी- pocso कायदा, बालविवाह, महिलांवरील अत्याचार या विषयावर मार्गदर्शन केले...सौ आशा बठारे  पोलीस पाटील नवखार यांनी- मुला मुलींचे लैंगिक शोषण यावर मार्गदर्शन केले...श्री सुनील कासार यांनी मुलांचे लैंगिक शोषण या विषयावर  मार्गदर्शन केले...डॉक्टर फरीद चिंबावकर वैद्यकीय अधिकारी रोहा- यांनी- आरोग्य विषयक सल्ले दिले...कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री टारपे सर यांनी केले...प्रास्ताविक मनोगत श्री भुजबळ सर यांनी केले...शेवटी आभार प्रदर्शन श्री नांगरे सर यांनी केले...

सदर च्या जनजागृती मोहिमेत पोलीस हवालदार श्री भास्कर शिद, न्यू इंग्लिश स्कूल चणेरा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष - श्री प्रमोदजी जाधव, सौ आशा बठारे पोलीस पाटील नावखार, श्री सुनील कासार पोलीस पाटील पांगळोली, सौ शीतल जाधव मॅडम पोलीस पाटील तळवडे, सौ मयुरी सुतार मॅडम पोलीस पाटील चांडगाव, श्री. हसमुख पवार पोलीस पाटील सारसोली, श्री प्रभाकर गायकर पोलीस पाटील महादेवखार, श्री गिरीश  विचारे पोलीस पाटील चणेरा, श्री अभिजीत भोईर पोलीस पाटील टेमघर,श्री रवींद्र आयरे पोलीस पाटील बिरवाडी,श्री अब्दुल रउफ पित्तू पोलीस पाटील खैरेखुर्द,डॉ. श्री फरीद चिंबावकर वैद्यकीय अधिकारी रोहा,ग्रामपंचायत खैरेखुर्द चे तंटामुक्त अध्यक्ष व पत्रकार श्री शहानवाज मुकादम, श्री दिपक पवार, न्यु इंग्लिश स्कूल चणेरेचे मुख्याध्यापक श्री के.बी.पाटील, सर्व शिक्षक आणि पालक संघ समिती सदस्य उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post