जमावावर पोलिसांनी केले गुन्हे दाखल
कांतीलाल पाटील : महाराष्ट्र वेदभूमी
चिखले - दि.३० : ग्रामपंचायतीच्या मालकीची शासकीय जमिन हडप केल्याच्या विरोधात देहत्यागाचा निर्धार करून सरपंच आणि त्यांच्या पतीने फिनेल प्राशन केल्याच्या घटनेनंतर गावातील संतप्त जमावाने गट विकास अधिकाऱ्यांची तासभर गाडी रोखून धरली... या प्रकरणी गराडा घालणाऱ्या जमावावर पनवेल तालुका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत...
चिखले ग्रामपंचायतची गावरान जमिन विक्रीचा साठेकरार माजी सरपंच, ग्रामसेविका व अन्य गृहस्थाने केल्याने त्यांच्याविरोधात कायदेशिर कारवाई करावी, ही मागणी घेवून सरपंच दिपाली तांडेल आणि पती दत्तात्रेय तांडेल यांनी लढ्याची हाक दिली होती. पनवेल तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांना बेदखल केल्याने काल, तांडेल कुटूंबियांनी घरात कोंडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढले आणि रुग्णवाहिकेतून हॉस्पिटल घेवून गेले...
या दरम्यान, संतापलेल्या गावकऱ्यांनी पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वठारकर यांची बोलेरो गाडी अडवून संबंधित दोषीवर कारवाई करण्याची मागणी रेटून धरत उत्स्फुर्त आंदोलन केले...
मात्र, सत्याच्या लढ्याने बिथरलेल्या ग्रामविकास अधिकारी गणेश दत्तात्रेय पाटील यांनी जमावातील १६ जणांविरोधात पनवेल तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.यामध्ये बेबी जगन म्हात्रे, गौरी महेश पाटील, मंदा विष्णु पाटील, मंगेश नामा म्हात्रे, प्रदिप राम पाटील,तुकाराम रामभाऊ तांडेल, उमेश पांडुरंग म्हात्रे, दत्ता मारूती पाटील, रघुनाथ मारूती पाटील, मच्छिंद्र चंदर पाटील, काशिनाथ भोईर, महेश काशिनाथ भोईर, केतन गोमा फडके लता वसंत चौधरी, जगन म्हात्रे, प्रतिक्षा उमेश म्हात्रे आदी ग्रामस्थांचा आरोपी म्हणून समावेश आहे...
