साकव कोसळल्याने संतापाची लाट...
कोलाड (श्याम लोखंडे): रोहा तालुक्यात सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळी कोसळलेला मुसळधार पाऊस, तसेच सदृश्य डोंगरभाग नाल्यातून वाहून आलेले पाणी त्यातच कालव्याचे पाणी यामध्ये देवकान्हे,धानकान्हे हद्दीत आदिवासीवाडी वस्तीकडे जाणाऱ्या मार्ग असणाऱ्या कालव्यावर नवीनच बनविलेला साकाव वाहून गेला... त्यामुळे येथील ग्रामस्थ नागरिकांचा रहदारी मार्ग असणारा साकव कोसळल्याने संतापाची लाट उसळली... यावर सदरील खात्याने लवकरात लवकर उपाय योजना करावी अशी मागणी आदिवासी ग्रामस्थांकडून केली जातेय..
रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीपात्र, डोलवहाळ सिंचनातून बारमाही वाहणारा कोलाड पाटबंधाऱ्याच्या उजवा तीर कालव्याची दुरुस्ती अनेक वर्षे सुरू आहे.. तसेच यावर काही ठिकाणी जीर्ण झालेले रहदारीच्या मार्गावरील साकव हे काढून तेथे नवे साकव पाटबंधारे विभागाच्या वतीने देवकान्हे, धानकान्हे हद्दीत बांधण्यात आले... तर ते बांधण्यात आलेले साकव हे मागील तीन चार दिवसांपूर्वी मुसळधार कोसळलेल्या पावसात वाहून गेले त्यामुळे नवा बनविण्यात आलेला साकव पहिल्याच पावसाच्या पूरपरिस्थित कोसळल्याने येथील आदिवासी नागरिकांचा रहदारीचा मार्गक्रमण बंद झाल्याने एकच संतापाची लाट उसळली आहे... हे निकृष्ट दर्जाचे काम ठेकेदार यांच्याकडून करण्यात आले असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे...
सध्या पावसाळ्यात खरिपाच्या भात पिकांची लागवड सर्वत्र जोरदार सुरू आहे...त्यामुळे येथील आदिवासी नागरिक मोल मजुरीसाठी ये जा करत असतात तर ऐन मोल मजुरी काळातच रहदारीचा मार्ग साकव पूल कोसळल्याने यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचे बोलले जात आहे... तर कालव्यात देखील चिखल माती भरपूर प्रमाणात वाहून आली आहे त्यामुळे कालव्यातून प्रवास करण देखील धोकादायक ठरत आहे... त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सदरील पाटबंधारे खात्याने याचे गांभीर्य लक्षात घेऊन उपाय योजना करावी अशी मागणी ग्रामस्थ नागरिक करत आहेत...
