महाराष्ट्र वेदभुमी

सालई गावात शिरला पट्टेदार वाघ



सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक :- तालुक्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या बफर झोनमधील पवनी वनपरीक्षेत्र हद्दीतल पिपरीया परिसरात सालई गावातील द रेस्पो हॉटेलच्या कंपाउंडच्या आतमध्ये एका वाघाने प्रवेश केला... ही घटना (दि.३) सकाळी ७ ते ८ वाजताच्या दरम्यान घडली... यामुळे तेथील हॉटेलचा कर्मचाऱ्यांसह गावाच्या नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले... 

पट्टेवाघ गावाशेजारील शेतातून थेट सालई गावालगत असलेल्या हॉटेल परिसरात शिरला... या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि गावातील नागरिकांनी आरडाओरड करत वाघाला जंगलाकडे हाकलून लावले... या घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. वनविभागाच्या या दुर्लक्षीत धोरणामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना शेती करणेसुद्धा कठीण झाले आहे... वारंवार वाघाचे हल्ले होत असल्याने शेतमजूरसुद्धा शेतात जाण्यासाठी तयार नसतात... त्यामुळे शेतीपिकांच्या उत्पादनावर परिणाम पडणार आहे... वनविभागाने निद्रावस्थेतून जागे होऊन वाघाचा बंदोबस्त करणे गरजेचे झाले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post