"डॉक्टर फरीद चिमावकर व त्यांची टीम आणि समाज सेवक बिलाल मोरबेकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे-पोलीस निरीक्षक मारुती पाटील"
रोहा: पोलीस ठाणे येथे मंगळवारी डॉक्टर्स डे चे औचित्य साधून आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते...
यंग युनिटी वेल्फेअर असोसिएशन व रोहा पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय पोलीस अधीक्षक रायगड श्रीमती आंचल दलाल यांच्या परवानगीने, तसेच उपविभागीय अधिकारी रविंद्र दौंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शिबीर घेण्यात आला असून रोहा, नागोठणे, कोलाड पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी पोलिसांची तपासणी करण्यात आली...
यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी रविंद्र दौंडकर, पोलीस निरीक्षक मारुती पाटील, सह पोलीस निरिक्षक नितीन मोहिते, डॉ संदेश शिंदे, डॉ सलमा मुकादम, डॉ सरजिल कर्जिकर, प्रजपती ब्रह्माकुमारी संस्थेचे दीदी, रोहा, नागोठणे, कोलाड पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी व अंमलदार उपस्थित होते...
सदरच्या शिबिरात रक्त तपासणी, बीएमडी (हाडांचे ठीसूळपणा), बीएमआय (चरबी तपासणी), इसीजी,पायाच्या नसांची तपासणी, लिपिड प्रोफाइल, लिव्हार फंक्शन टेस्ट, रिनल फंक्शन टेस्ट, सी बी सी सिंकल सेल, ब्लडप्रेशर, ब्लड शुगर, थायरॉईड, इत्यादी रक्त चाचण्या करण्यात आल्या,
तसेच आरोग्याबाबत तपासणी करुन योग्य ती काळजी घेण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन तज्ञ डॉक्टरकडून करण्यात आले...
