महाराष्ट्र वेदभुमी

शौर्य उमाटे याची 'जम्प रोप वर्ल्डकप' साठी निवड



केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या शुभेच्छा

प्रतिनिधी : सचिन चौरसिया 

रामटेक:- हुडकेश्वर नागपूर येथील रहिवासी असणाऱ्या तथा स्कुल ऑफ स्कॉलर, हुडकेश्वर येथे सहाव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या शौर्य संदीप उमाटे याची कावासाकी जपान येथे दिनांक २७ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान होण्याऱ्या 'जम्प रोप वर्ल्ड कप २०२५' या स्पर्धेसाठी निवड झालेली आहे...

तेव्हा याबाबत नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या विद्यार्थ्याला शुभेच्छा दिलेले आहे... जिल्ह्यातील काही खेळाडूंनी नाशिक येथे १३ ते १५ फेब्रुवारी २०२५ दरम्यान झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघात सहभाग नोंदवून महाराष्ट्रासाठी पदके पटकावली होती... त्यामुळे त्यांची निवड कावासाकी जपान येथे होणाऱ्या जम्प रोप वर्ल्डकप २०२५ या स्पर्धेसाठी भारतीय जम्परोप संघात झाली होती, त्यामध्ये शौर्य संदीप उमाटे या स्पर्धकाचाही समावेश होता...ही स्पर्धा दि. २७ जुलै ते ०३ ऑगस्ट २०२५ दरम्यान कावासाकी जपान येथे संपन्न होणार असून भारताच्या संघात खेळाडू म्हणून शौर्य संदीप उमाटे हा स्पर्धक राहणार आहे... शौर्य ने तिन वेळा राज्यस्तरीय सिल्वर मेडल तथा एक वेळा नॅशनल लेव्हल सिल्वर मेडल पटकावले आहे... नियमित सराव व वेळोवेळी शिक्षकांचे मार्गदर्शन तथा प्रोत्साहन मिळाल्याने मी ही भरारी घेतली असल्याचे शौर्यने सांगितले आहे... शौर्य ने देशाचे नाव उंचावल्याने त्याचे सर्व स्तरातून कौतुक केल्या जात आहे...

Post a Comment

Previous Post Next Post