रामटेक -: तलावाच्या पायऱ्या उतरत असताना अचानक त्याचा पाय खोल पाण्यात गेला. पाण्याचा अंदाज न आल्याने १८ वर्षीय सुजल पटले रा. कटोरी मानेगाव, ता. खैरलांजी जि. बालाघाट यांचा तलावात बुडून करून अंत झाला... आज बुधवार (दि.२३) दुपारी १.०० वाजताचा सुमारास दुर्दैवी घटना घडली... या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे... कटोरी मानेगाव राहणारे (दि.२३) जुलैला सुजलचे वडील त्याच्या मावशीच्या अस्थि विसर्जनासाठी संपूर्ण कुटुंबासह अंबाळा येथे आलेले होते... अस्थी विसर्जन झाल्यानंतर काहीजण आंघोळीसाठी पाण्यात उतरले... यामध्ये सुजलचाही समावेश होता... तलावाच्या पायऱ्या उतरत असताना अचानक त्याचा पाय खोल पाण्यात गेला... पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडायला लागला... लोकांनी यावेळी आरडाओरड केली... मात्र त्याला कोणतीही मदत मिळाली नाही त्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला... रामटेक पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ एसडीआरएफ या टीमला कळवलं परंतु ते येईपर्यंत स्थानिक नागरिकांनी सुजल मृतदेह पाण्याबाहेर काढला होता... पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय रामटेक मध्ये पाठवला असून पुढील तपास रामटेक पोलीस करत आहेत...
