महाराष्ट्र वेदभुमी

सोनेघाटमध्ये वीज पडून दोन महिलांचा मृत्यू : पाच जखमी

प्रतिनिधी : सचिन चौरसिया

रामटेक :- रोवणी करण्यासाठी शेतावर गेलेल्या मजुरांच्या अंगावर वीज कोसळली... यात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच महिला गंभीर जखमी झाल्या... ही घटना रामटेक तालुक्यातील सोनेघाट शेतशिवारात जेवण करितांना शुक्रवार (दि.१८) दुपारी २.०० वाजताच्या दरम्यान घडली... जखमी महिलांवर रामटेकातील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत... मागील आठवडाभरापासून पावसाने खंड दिला आहे. अशातच काल पाऊस आल्याने या परिसरातील शेतकऱ्यांनी धानाच्या रोवणीला सुरूवात केली आहे... रामटेक पासून ३ किलोमीटर अंतरावरील सोनेघाट शेतशिवारातील रमेश जगन्नाथ राहाटे यांच्या शेतावर २५ महिला मजूर रोवणीच्या कामात व्यस्त होते... दुपारी जेवण करतांना दरम्यान वारा, पाऊस ढगांचा गडगडाट होऊन अचानक वीज पडली... यात मंगलाबाई जीवन मोटघरे (४०) रा. शीतलवाडी आणि वर्षा देवचंद हिंगे (३३) रा. भोजापूर या दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला...  तर जयश्री आकाश जवादे (३०), रंजू राजु आष्टनकर (३८), वनिता गजानन नागरिकर (५५) तिघेही रा. रामाळेश्वर वार्ड रामटेक आणि प्रमिला वासुदेव आष्टनकर (४९) रा. भोजापूर, कलाबाई कवडू वरघणे (६०) या पाच महिला जखमी झाल्या... त्यांवर रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post