शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून अहवाल मागविणार.
कोलाड (श्याम लोखंडे): रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यात इको सेन्सेटिव्ह झोन टाकण्यात आल्याचा मसुदा तहसील कार्यालयाकडून जारी करण्यात आला असून रायगड जिल्ह्यातील तब्बल 437 गावे ही इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येत असल्याचे केंद्रशासनाच्या मसुदामध्ये आहे... तर त्यात रोहा तालुक्यातील 119 गावांना वन व पर्यावरण विभागाने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे संवेदनशील गावे म्हणून घोषित करत असुन यात आम्ही सदरील देवकान्हे, धानकान्हे, चिल्हे, तळवली, या गावांचा समावेश आहे या अनुषंगाने यावर हरकती घेत शेतकरी ग्रामस्थांवर लादले जात असलेले वन पर्यावरण संवेदनशील क्षेत्र हे रद्द करण्यात यावा यासाठी रोहा तालुक्यातील वरील ग्रामस्थानी सोमवारी २१ जुलै रोजी याबाबत रायगड जिल्हा अधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी किशन जावळे यांना निवेदन देण्यात आले... यावेळी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून अहवाल मागविणार असल्याचे आश्वासन प्रसंगी उपस्थित शेतकरी ग्रामस्थांना दिले...
यावेळी तळवली तर्फे अष्टमी ग्राम पंचायतीचे सरपंच रविंद्र मरवडे, माजी सरपंच वसंतराव मरवडे, धनाजी लोखंडे, रोहा तालुका पंचायत समितीचे माजी सभापती बाळकृष्ण बामणे, राम महाडिक, रविंद्र कान्हेकर, नंदकुमार मरवडे, शेतकरी संघटनेचे रोहा तालुका सचिव जगदीश जाधव, पांडुरंग गोसावी, विश्वास राऊत, किशोर भोईर, दामा भोईर, वसंत शेडगे, उद्धव आव्हाड आदी शेतकरी ग्रामस्थानी जिल्हाधिकारी यांना वन पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित हरकतीबत निवेदन दिले...
केद्र शासनाचे पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालय भारत सरकार, नवी दिल्ली यांनी पर्यावरण संवेदनशिल क्षेत्र घोषीत करण्यासाठी क्र.एस.ओ.३०६० (ई) ३१/०७/२०२४ अन्वये जारी केलेली मसुदा अधिसुचना... तसेच प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा सचिव महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ चे पत्र. म.रा.औ.वि.मं./५/डब्ल्युजीईएसए/३९०, २०२४-२०२५, दि.१२/८/२०२४,जिल्हाधिकारी रायगड यांचेकडील पत्र जा.क्र.मशा/अ ३/डब्ल्युजीईएसए/अधिसुचना, दि.१०/०६/२०२४,उप सरसंरक्षक रोहा वन विभाग रोहा यांचे कार्यालय क्रमांक,ब/११/मोजणी/११४३/२०२५-२६, दि.११/०६/२०२४ ची प्रारूप अधिसूचना प्रत. संदर्भिय अधिसुचनेनुसार केंद्र शासनाचे पर्यावरण वने व वातावरण बदल मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी पर्यावरण संवेदनशिल क्षेत्र घोषीत करण्यासाठी क्र.एस.ओ. ३०६० (३) ३१/०७/२०२४ अन्वये मसुदा अधिसुचना जारी केली आहे... त्या अनुषंगाने आपण दि.११/०६/२०२४ रोजी प्रारूप अधिसुचना प्रसिध्द केली आहे... रोहे तालुक्यांतील एकूण ११९ गावांना ही अधिसुचना लागु करण्यासाठी जारी केली आहे... त्यावर विरोध दर्शवित तसेच येथील बळीराजा शेतकरी यांची देखील हरकत असून हे केंद्रीय वन पर्यावरण संवेदनशील क्षेत्र रद्द करण्यात यावा असे निवेदन रोहा तालुक्यातील देवकान्हे, धानकान्हे, चिल्हे, तळवली येथील ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी किशन जावळे यांना देत याबाबत रोहा तहसीलदार, प्रांताधिकारी, उप वन संरक्षण अधिकारी यांना पडलेल्या इको सिन्स्विटी झोन विरोधात यांच्या कडून अहवाल मागून घ्यावे अशी आग्रही मागणी येथील ग्रामस्थानी केली यावर जिल्हाधिकारी यांनी सांगितले की याबाबत हे अहवाल मागून घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन उपस्थित ग्रामस्थांना दिली...
