देवलापार येथील हरणाकुंड नाल्याजवळ कट्टा शिवारातील घटना
प्रतिनिधी : सचिन चौरसिया
रामटेक :- नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर हरणाकुंड नाल्याजवळील कट्टा शिवारात मागून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर गाडीने ट्रकला जोरदार धडक दिली... या अपघातमध्ये एक जण जागीच ठार झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले... हा अपघात शनिवार (दि.१९) ला पहाटे ३.३० वाजताचा सुमारास झाला... साकीर समशेर (वय ३६) रा. देवलापार यांचा मृत्यू झाला... जखमींमध्ये विजय सोदराम कुमरे (३५) आणि विलास चरण कोडवते (२८ ) दोघेही रा. निमटोला, देवलापार यांचा समावेश आहे... साकिर अली हे देवलापार येथील व्यापारी हेमंतकुमार जैन यांच्या मालकीची आयशर मालवाहतूक गाडी क्र. एमएच ४० वाय ४००९ चालवत होते... हेमंतकुमार यांचा किराणा व्यवसाय असून दर शुक्रवारी गाडी नागपूरला साहित्य आणण्यासाठी जाते... याच अनुषंगाने शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास गाडी नागपूरवरून देवलापारकडे निघाली होती... गाडीत चालकासह दोघेजण सहप्रवासी होते... देवलापारपासून तीन-चार किमी अंतरावर असताना समोरून नागपूरहून येत असलेला ट्रक क्र. एमएच ४० बीएल २५१२ अचानक बिघाड झाल्याने त्याचा वेग कमी झाला... त्यामुळे मागून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर गाडीने ट्रकला जोरदार धडक दिली... धडकेत साकीर अली यांचा जागीच मृत्यू झाला... त्यांचे शरीर गाडीच्या समोरील भागात अडकले होते आणि त्याला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले... जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे.याप्रकरणी देवलापार पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, ठाणेदार नारायण तुरकुंडे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक टीकाराम जाधव करीत आहेत...
