सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक:- शहरात बर्याच वर्षांपासून ५० टक्क्यावर लोक हे झुडपी जंगल जमिनीवर अतिक्रमण करून राहत आहेत. त्यांच्या नावाने या जमिनीचे पट्टे नव्हते. त्यामुळे त्यांना प्रधानमंत्री घरकूल आवास योजनाच्या लाभापासून वंचित राहावे लागत होते... गरजू नागरिकांना कायम स्वरुपी रहिवासी पट्टे देण्याकरिता प्रशासनाने पुढाकार घ्यावा व सुजीप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई करावी अशी मागणी करीत निवेदन दिले... तसेच रामटेक शहरातील एक्सप्रेस फिडर व वाढीव पाईप लाईन च्या कामाला सुरूवात करून शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायम स्वरुपी निकालात काढावा अशी मागणी करत रामटेक भाजप चे वतीने उपविभागीय अधिकारी रामटेक यांना निवेदन देण्यात आले... यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजय मुलमुले, तालुका अध्यक्ष योगेश मात्रे, माजी अध्यक्ष राहुल किरपान, शहर अध्यक्ष उमेश पटले, विवेक तोतडे, आलोक मानकर, रामानंद अडामे, रजत गजभिये, नंदकिशोर कोहळे,वनमाला चौरागडे,उज्वला धमगाये, चित्रा धुरई, कविता मुलमुले, शिल्पा रणदिवे, नेहा गावंडे, करीम मालाधारी, संजय समरीत, सदाराम गाते, सतीश दुनेदार,सोनी धुरई, रश्मी गोन्नाडे, शुभांगी धारणे, प्रशांत टक्कमोरे, कुणाल बागडे, शरद कुमले, अजय बागडे, सम्रीत नागपुरे सह भाजपा पदाधिकारी व वनजमिनींवर अतिक्रमण करून राहणारे नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते...