महाराष्ट्र वेदभुमी

Lरायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी अघोरी विद्या

 

अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार दाखल करणार : शिवसेना नेते वसंत मोरे

 कांतीलाल पाटील :  महाराष्ट्र वेदभुमी 

रायगड, दि.१९ : पुरोगामी महाराष्ट्रात आयुष्यभर अंधश्रद्धे विरुद्ध लढणारे आणि प्राणाची आहुती देणारे नरेंद्र दाभोलकर यांच्या महाराष्ट्रात पालकमंत्री पद मिळावे म्हणून महाराष्ट्राचे मंत्री आघोरी विद्या करत आहेत.

शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भरत गोगावले यांनी त्यांच्या घरी अघोरी पूजा केल्याचा दावा केला जातोय. यावेळी महायुतीतील सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे... या आधी दोनच दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनीही तसाच एक व्हिडीओ शेअर केला होता...

शिंदेंचे मंत्री भरत गोगावलेंचा मांत्रिकासोबतचा आणखी एक व्हिडीओ राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांकडून शेअर करण्यात आला आहे... मागील काही दिवसांपासून रायगडच्या पालकमंत्री पदावरून भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यात शीत युद्ध सुरू आहे... त्यामुळे सूरज चव्हाण यांनी भरत गोगावलेंचा शेअर केलेल्या व्हिडीओला रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या वादाची किनार असल्याची चर्चा सुरू आहे... या आधी वसंत मोरेंनीही भरत गोगावलेंवर अशाच स्वरुपाचे आरोप केले आहेत... भरत गोगावलेंनी निवडणुकीच्या वेळी त्यांच्या घरी अघोरी पूजा केल्याचा आरोप वसंत मोरेंनी केला... १७ ऑक्टोबर २०२४ रोजी बगलामुखी मंदिरातून ११ पुजारी बोलावून भरत गोगावलेंनी पूजा केल्याचा आरोप त्यांनी केला... एवढंच नाहीतर राज्यातून मांत्रिक आणून गोगावले अघोरी पूजा घालायचे... असा आरोप वसंत मोरेंनी केला... गोगावलेंचे पूजेचे व्हिडीओही त्यांनी शेअर केले आहेत...

तुमचा तुमच्या कामावर विश्वास नाही का? मग अशा पूजांचा आधार का घेतला? असा सवालही वसंत मोरे यांनी भरत गोगावलेंना केला... या पूजेसाठी इतर राज्यातून मांत्रिक बोलावण्यात आले आणि त्या पूजेचे व्हिडीओ आमच्याजवळ उपलब्ध आहेत... जर गोगावले यांनी हे नाकारले तर आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार दाखल करू असा इशाराही शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरेंनी दिला...

Post a Comment

Previous Post Next Post