सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक: पंचायत समिती रामटेक येथील शेतकरी भवन येथे (दि.१९) विषारी व बिनाविषारी सर्प ओळख, विषाक्त लक्षण, प्राथमिक उपचार, योगा व ध्यान यावर कार्यशाळा आयोजीत केली होती. कार्यशाळेचे आयोजन बाईल्डलाईफ वेल्फेर सोसायरी नागपूर द्वारा आयोजीत केली होती. कार्यक्रमाची अध्यक्षता तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता काकडे काकडे यांनी केली. कार्यशाला मधे हार्टफुलनेस सेंटरचे डॉ. दिक्षीत यांच्या तर्फे योगा व ध्यान यावर मार्गदर्शन केले. या वेळी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, आशा गटप्रर्वक, तालूक्यातील सर्व आशा स्वयसेविका, सर्वमित्र उपस्थित होते. कार्यशाला यशस्वीतेकरीता आरोग्य कर्मचाऱ्यानी प्रयत्न केले...
