महाराष्ट्र वेदभुमी

सुकेळी खिंडीत दरड कोसळण्याचा धोका वाढलाय..संरक्षण भिंत बांधण्याची गरज,

गटार नसल्यामुळे डोंगरावरची माती दगड रस्त्यावर, प्रवाशांच्या जीवाला धोका 

पुगांव रोहा(नंदकुमार कळमकर): मुंबई-गोवा महामार्ग ६६ वरील सुकेळी खिंडीत मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे दरड कोसळण्याचा धोका वाढला असुन सुकेळी खिंडीत संरक्षण भिंत बांधण्याची गरज निर्माण झाली आहे... तसेच दोन्ही बाजूच्या रस्त्याचे काम जवळ जवळ पूर्ण झाले आहे परंतु रस्त्याच्या बाजूला गटार बांधण्यात आला नसल्यामुळे तुफान पडत असलेल्या पावसामुळे डोंगर माथ्यावरील दगड, माती, सरळ रस्त्यावर येत असल्यामुळे प्रवाशी वर्गाच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे....

    मुंबई-गोवा महामार्गावरील सुकेळी खिंड हे निर्जन ठिकाण आहे. या ठिकाणी महामार्गाच्या कामासाठी दोन्ही बाजूचे डोंगर खोदून ठेवले आहेत.. यामुळे डोंगराची माती सैल झाली असुन यामुळे डोंगर माथ्यावरील दगड धोंडे तसेच माती खाली येण्याचा धोका वाढला आहे... तसेच दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला असुन यामुळे  प्रवाश्यांचा नाहक बळी जाऊ शकतो... याची खबरदारी म्हणून उपाययोजना करण्यात यावी अशी प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे...

   मुंबई-गोवा महामार्गवरील सुकेळी खिंड हे निर्जन ठिकाण आहे... या महामार्गावर वेडीवाकडी वळणे, चढ उतारावर असणारा रस्ता, यामुळे येथील वाहन चालकांना एकंदरीत परिस्थितीचा अंदाज येत नाही.यामुळे डोंगर माथ्यावरून आलेले दगड गोटे, माती रस्त्यावर आली तर वाहनचालकांच्या त्वरित लक्षात येत नाही यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे...

 मुंबई-गोवा महामार्गावर अनेक पर्यटन स्थळे,असंख्य औद्योगिक क्षेत्र, तसेच शाळा कॉलेज असल्यामुळे या मार्गांवरून छोट्या मोठया वाहनाची सतत मोठया प्रमाणात वाहतूक सुरु असते...यामुळे या मार्गांवरून सुकेळी खिंडीतील असणाऱ्या चढ उतारामुळे कोणतेही परिस्थितीचा अंदाज येत नाही...यामुळे अनेकवेळा मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी ही निर्माण होत आहे...

   प्रतिक्रिया 

 मुंबई-गोवा महामार्गांवरील सुकेळी खिंडीत पावसाळ्यात दरवर्षी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत यामुळे तासंतास वाहतूक कोंडी निर्माण होते... यामुळे प्रवाशी वर्गाचा खोलंबा होतो... या ठिकाणी रस्त्याच्या रुंदीकरणासाठी डोंगर खोदण्यात आले आहेत यामुळे डोंगराची माती सैल झाली असल्यामुळे दरड कोसळण्याचा धोका अधिक वाढला आहे दरड कोसळण्याचा धोका टाळण्यासाठी दोन्ही डोंगराला संरक्षण भिंत बांधण्यात यावी... दिनकर सानप, सामाजिक कार्यकर्ते

Post a Comment

Previous Post Next Post