महाराष्ट्र वेदभुमी

विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त

दिवसात पंधरा ते विस वेळा लाईट बंद 

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक:- परिसरातील विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त झाले आहेत... अचानक वीज गेल्याने नागरिक उकाड्याने हैराण होतात... खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत कधी होईल याची वाट नागरिक पाहत राहतात... महावितरणचा भोंगळ कारभराचा फटका नागरिक व व्यावसायिकांना विनाकारण सहन करावा लागत आहे... यात विद्युत विभाग मात्र सुस्त दिसून येत आहे... देवलापार परिसरात ७२ गावांचा समावेश आहे... यात दोन ठिकाणी अभियांत्याची कार्यालय आहेत... दोन कार्यालये असून देखील या कार्यालयाचा भोंगळ कारभार आहेत... विजेची कोणतीही देखभाल केली जात नाही वेळवर झाडांची छाटाई न केल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत... अनेकदा छाटाईच्या नावावर लाईट बंद केली झाले... या वेळेव्यतिरिक्त अनेकदा विनाकारणच तीन ते चार तासांचे अघोषित भरणीयमानाचं होते आहेत... एकीकडे उन्हाचा तडका व दुसरीकडे लाईट गोल यामुळे नागरिक त्रस्त झाले असले तरी विभाग मात्र सुस्त दिसून येत आहेत... सद्या दिवसा उन्हाचा तडका तर रात्री किव्हा दुपार नंतर पावसाचे वातावरण तयार होते त्यामुळे विचित्र गर्मी होते आहे... मात्र याकडे लक्ष कोण देणार हा चिंतेचा विषय आहेत...

विविध ठिकाणच्या खंडित वीजपुरवठा

परिसरात शेतीला लागून घरे असल्याने सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती सुद्धा नागरिकांना भेळसावत आहेत... एकीकडे भारनियमन नसल्याने महावितरण कडून सांगण्यात येत असतानाच दुसरीकडे ऐन उन्हाळ्यात विविध ठिकाणच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे होणाऱ्या व्यावसायिकांचेही नुकसान होत आहे. काही भागात सकाळी कोणत्याही वेळेत वीजपुरवठा खंडित होता असते... तर काही भागात दुपारी साडेबारा वाजता खंडित केला जातो... सर्वच परिसरात कोणता ना कोणता तांत्रिक बिघाडाचे कारण दिले जात असले,.. तरी सातत्याने खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याने नागरिक पुरते त्रस्त झाले आहेत...

नागरिकांची करतात दिशाभूल

एकीकडे अव्वाच्या सवा बिले आकारली जात आहेत. दुसरीकडे अतिरिक्त सुरक्षा ठेवींच्या नावाखालीही बिलापेक्षा अधिक पैसे घेतले जात आहेत परंतु वीज पुरवठयात माञसातत्य नाही... महावितरण कडून नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असते... महावितरण अधिकाऱ्यांकडून केवळ आश्वासनेच दिली जात असल्याचे अघोषित भारनियमनामुळे दिसत आहे... तांत्रिक बिघाडाचे कारण ग्रामीण भागातील नागरिक आधीच गर्मीने हैराण झालेले आहेत... त्तांत्रिक बिघाडाचे कारण देत नागरिकांची दिशाभूल करीत असता...

दोन पावर स्टेशन तरीही पुरवठा जैसे थे

आदी पवनी येथे ३३ के व्ही पॉवर हाउस आहे.या ठिकाणावरील विद्युत पुरवठ्या अनेक अडचनी निर्माण होत होत्या परंतू कालांकराने वडांबा नजीक ११ के व्ही उपकेंद्र उभारण्यात आले... काही भागात पवनी तर काही भागात वडांबा वरून विद्युत पुरवठा देण्यात आला.परंतू इतकी व्यवस्था असतांना देखील विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होतो याकडे विभागाचे लक्षच दिसुन येत नाही...

Post a Comment

Previous Post Next Post