महाराष्ट्र वेदभुमी

अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार ? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना;



न्यूज वार्ताहर: अहमदाबादमध्ये 12 जून रोजी एअर इंडियाचे विमान कोसळले. हे विमान एका वसतिगृहावर कोसळले, या अपघातामध्ये 270 जणांचा मृत्यू झाला... दरम्यान, हा अपघात नेमका कोणत्या कारणमुळे झाला ? हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. विमानातील ब्लॅक बॉक्स सापडला आहे. या ब्लॅक बॉक्समधून सर्व माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे... पण आता एक नवीन समस्या समोर आली आहे... या अपघातामध्ये या ब्लॅक बॉक्सचेही नुकसान झाले असून माहिती मिळण्यात अडचणी येत आहेत...

 विमान अपघातानंतर एक विशेष प्रशिक्षित हवाई अपघात तपास पथक तयार केले जाते... जे ब्लॅक बॉक्स शोधण्याचे काम देखील करते. भारतात या पथकांना नागरी विमान वाहतूक महासंचालनालय आणि विमान अपघात तपास ब्युरो पाठवतात... विमान अपघातामागील कारणे शोधण्यासाठी ब्लॅक बॉक्स महत्वाचा मानला जातो... या बॉक्समध्ये विमानातील सर्व घटना रेकॉर्ड केलेल्या असतात... यामुळे आता अहमदाबाद विमान अपघातामागील कारणे शोधण्यासाठी ब्लॅक बॉक्स महत्वाचा आहे... यामुळे आता या ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळण्यासाठी बॉक्स अमेरिकेला पाठवला जाणार आहे... यासाठी तयारी सुरू केली आहे... 

 अहमदाबाद विमान अपघातातून सापडलेला ब्लॅक बॉक्स आता डेटा रिकव्हर करण्यासाठी अमेरिकेला पाठवला जाणार आहे... भारत सरकार लवकरच या प्रकरणावर निर्णय घेईल... मिळालेल्या माहितीनुसार, क्रॅश झालेल्या एअर इंडिया विमानाचा ब्लॅक बॉक्स वॉशिंग्टन डीसीला पाठवला जाईल, तिथे त्याची राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळात चौकशी केली जाईल...या ब्लॅक बॉक्ससोबत एक भारतीय टीम देखील पाठवली जाईल, ही टीम तपासादरम्यान सर्व प्रोटोकॉलचे निरीक्षण करणार आहे...

Post a Comment

Previous Post Next Post