महाराष्ट्र वेदभुमी

२१ जून रोजी रोह्यात मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन व रुद्रपूजा अभिषेक सोहोळा.

कोलाड (श्याम लोखंडे): वैदिक धर्म संस्थान व दि आर्ट ऑफ लिव्हिंग रोहा आयोजित आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक दर्शक हाथी जी यांच्या मार्गदर्शनाखाली मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळा आणि रुद्रपुजा रोहा नगरीत प्रथमच शनिवारी 21 जून रोजी रोजी भाटे वाचनालय रोहा येथे ठीक सायंकाळी पाच वाजता संपन्न होत असून याचा दर्शनाचा लाभ तालुक्यातील सर्व भाविकांना घ्यावा असे आवाहन ओबीसी समन्वय समितीचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेश मगर यांनी केले आहे...

अकराव्या शतकात, (इ.स. १०२६ मध्ये) क्रूर महमूद गझनीने सोमनाथ मंदिरावर चढाई केली आणि पवित्र शिवलिंगाचे तुकडे तुकडे केले. मंदिर नष्ट झाले, पण काही निष्ठावंत पुजाऱ्यांनी गुपचूप त्याचे काही अवशेष वाचवले... या पवित्र अंशाना त्यांनी आपल्या जीवावर उदार होऊन लपवले आणि पिढ्यानपिढ्या हे रहस्य जपले गेले. जवळपास एक हजार वर्षे, हे अवशेष गुप्त ठिकाणी सुरक्षित राहिले, भक्तांच्या श्रद्धेने जिवंत ठेवले गेले याचा लाभ रोहे करांना लाभणार असून तालुक्यातील असंख्ये भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही मगर यांनी केले आहे...

तसेच कालांतराने, नियतीच्या खेळाने हे अवशेष गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्यापर्यंत पोहोचले. काही संत म्हणतात, हा दैवी संकेत होता; प्राचीन पुजारी पुरोहितांच्या वंशजांनी गुरुदेवांना हे पवित्र अंश सुपूर्द केले... गुरुदेवांनी त्यांचे आध्यात्मिक महत्त्व ओळखून भक्तांसाठी महाशिवरात्रीच्या भव्य सोहळ्यात याचा लिंगाभिषेक केला गेला हेच ते पवित्र शिवलिंग आपल्या रोहा नगरीत दर्शनसाठी सर्वांना खुले राहणार आहेत तसेच यावर रुद्रपुजा अभिषेक सोहळा व दर्शन सर्वांना लाभणार असून याचा लाभ घ्यावा असे सांगत सुरेश मगर यांनी आवाहन केले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post