महाराष्ट्र वेदभुमी

एक दिवस पर्यावरणासाठी..!सचिन घाडी मित्रमंडळाच्या वतीने रामधरणेश्वर येथे बीजारोपण,


सोगाव - अब्दुल सोगावकर : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आजही अनेक सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक संस्था कार्यरत राहून लढा देत आहेत, त्यांच्या मुळेच आज अनेक ठिकाणी वणवे विझविणे, झाडे वाचवा झाडे लावा या सारखे उपक्रम राबवले जात आहेत... हा निसर्ग आपल्याला प्रत्येक जीव सजीव यांना जगण्यासाठी आपल्याला प्राणवायू, हवा, पाणी आदी मुख्य घटक देऊन जीवन जगण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडत आहेत. या निसर्गाने आपल्याला विपुल प्रमाणात संपत्ती प्रदान केली आहे... या निसर्गाचे आपण काही तरी देणे लागतो याच उदात्त हेतूने अलिबाग तालुक्यातील मुनवली येथील सचिन घाडी मित्रमंडळाच्या वतीने रविवार दि. १ जून २०२५ रोजी विस्तीर्ण स्वरूपात असलेल्या रामधरणेश्वर डोंगरावर मोकळ्या जागेत चिंच, जांभूळ, आंबे अशा विविध प्रकारच्या हजारो बियांचे टिकाव, फावडे आदींच्या सहाय्याने बीजारोपण व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या वडाच्या झाडांच्या फांद्या आदींचे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले...

     यावेळी सचिन घाडी मित्रमंडळाच्या सर्व मुले व मुली, तसेच ज्येष्ठ नागरिक व इतर सभासदांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता... मित्रमंडळाच्या वतीने समाजासाठी आदर्श निर्माण   करणारा उपक्रम हाती घेतल्याबद्दल त्या उपक्रमात सर्व सहभागी सदस्यांचे कौतुक केले जात आहे...

फोटो लाईन : रामधरणेश्वर डोंगरावर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सचिन घाडी मित्रमंडळाच्या वतीने बीजारोपण व वंडांच्या झाडांच्या फांद्यांचे वृक्षारोपण करताना सहभागी मंडळाचे सर्व सदस्य.

Post a Comment

Previous Post Next Post