सोगाव-:अब्दुल सोगावकर : अलिबाग तालुक्यातील थळ बाजार येथील दिलीप पांडुरंग मयेकर(वय ७५) यांचे शनिवार दि. ३१ मे २०२५ रोजी संध्याकाळी ३ नंबरच्या मुलीच्या सासरी वाडगाव - अलिबाग या ठिकाणी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे, त्यांच्या अकस्मात निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे...
दिलीप मयेकर हे मागील पाच वर्षांपासून विविध आजाराने त्रस्त झाले होते, त्यांची सर्व उपचारसेवा व काळजी ३ नंबरची मुलगी रिद्धी हि घेत होती... निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या नातेवाईक व मित्रपरीवारानी त्यांच्या थळ बाजार येथील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी व अंत्यसंस्कारासाठी एकच गर्दी केली होती. त्यांच्या पश्चात १ बहीण, एकूण ४ विवाहित मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी सोमवार दि. ९ जून रोजी तर तेरावे गुरुवार दि. १२ जून रोजी थळ बाजार येथील निवासस्थानी होणार आहेत. कोणत्याही प्रकारचा दुखवटा स्वीकारला जाणार नाही असे कुटुंबियांच्या वतीने सांगण्यात आले आहे...
