महाराष्ट्र वेदभुमी

मृत व्यक्तीच्या अंतविधीला स्मशानभुमी मिळेना

 

मृत व्यक्तींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करायचा कुठे ?

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक :- तालुक्यातील कुठल्याही गावामध्ये जा तिथे नदी किंवा तलावाच्या कडेला एकतरी स्माशनभूमी असतेच. अनेक गावं अशी आहेत जिथे अद्याप पाण्याची किंवा वीजेची सोय पोहचलेली नाही पण तिथे स्मशानभूमी मात्र आहे. कारण माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या पार्थिवावार अंत्यसंस्कार हे स्मशानभूमीतच केले जातात. मात्र, महाराष्ट्रामध्ये असं एक गाव आहे जिथे स्मशानभूमीच नाही. आजनी असं या नावाचं गाव असून, सुरुवातीपासूनच या गावात एकही स्मशानभूमी नाही. त्यामुळे या गावात कुणाचं निधन झाल्यास काशिनाथ मंगलू शेंडे यांच्या शेतात नाल्याच्या किनारी त्याचे अंतिम संस्कार केले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून याठिकाणी हीच परिस्थीती आहे. रामटेक तालुक्यातील आजनी हे गाव रामटेक पासुन केवळ १० किलोमीटर अंतरावर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या गावामध्ये स्मशानभूमीच नाही. त्यामुळे गावातील मृत व्यक्तींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करायचे असल्यास गावकऱ्यांना गावापासून दूर २ किलोमीटर अंतरावर असलेल्या काशिनाथ मंगलू शेंडे यांच्या शेतात नाल्याकाठी जाऊन अंत्यसंस्कार करावे लागतात. असं म्हणतात की, एकाद्याला जिवंतपणी कितीही कठीण प्रवास करावा लागला असले, तरी मृत्यूनंतर त्याचा प्रवास सुरळीत व्हायला हवा. मात्र, आजनीवासीयांच्या नशिबी मृत्यूनंतरचा प्रवासही काहीसा कठीण असल्याचंच म्हणावं लागेल. स्मशानभूमी नसल्यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल गावकऱ्यांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. स्व. काशिनाथ मंगलू शेंडे हे आता हयात नाहीत परंतु त्यांचे वारसदार मौजा आजनी येथील प.ह.नं. ३९ सर्वे क्र. १३९ आराजी ०.१९ आर जमा ०.२५ हक्क वर्ग १ ही शेतजमीन शासकीय दराप्रमाणे मोबदला मिळाल्यास ग्रामपंचायत कार्यालय आजनी येथे स्मशानभूमी व सौंदर्यकरण करिता देण्यास तयार आहेत. परंतु ग्रामपंचायतचे उत्पन्न हे घरकर व पाणीकर यावरच अवलंबून असल्याने त्यांना ही जागा घेणे शक्य नाही. ग्रामपंचायतने प्रशासनाकडे  याबद्दल वेळोवेळी पाठपुरावा देखील केला. मात्र, शासन दरबारी आमच्या मागणीला काहीच किंमत नसल्याचं दिसतंय. ग्रामस्थ शेतात किंवा नदीच्याकडेला मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार करतात. गावाला स्मशानभूमी न देणे हा एकप्रकारे त्या पार्थिवाचा अपमान होत आहे...

अतिशय लाजिरवाणी गोष्ट

सरपंच मनोज लिल्हारे सह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची ही जागा ग्रामपंचायतला मिळावी करिता शासनाकडे धडपड सुरु आहे. वेळोवेळी ग्रामपंचायतने शासनाकडे पाठपुरावा केला. परंतु अजूनपर्यंत आजनीवासीयांना स्मशानभूमीसाठी जागा मिळालेली नाही. देशात लोकशाही येऊन इतकी वर्ष झाली तरीही आम्हाला अंत्यसंस्कारांसाठी हक्काची स्मशानभूमी मिळत नाही, ही शासनासाठी खूप लाजिरवाणी गोष्ट आहे, अशा शब्दांत येथील ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला आहे...

Post a Comment

Previous Post Next Post