पोलिस ठाण्यावर निषेध मोर्चा,
अन्यथा 7 जून रोजी जिल्हा पोलिस प्रमुख कार्यालयाला घेरावा घालणार - शिवाजीराव आवळे यांचा इशारा
पेठवडगाव - प्रतिनिधी
सध्या सत्तेवर असणाऱ्या या सरकारला सत्तेत आणण्यात महाराष्ट्रातील मातंग सामाजाचा मोठा वाठा असताना महाराष्ट्रात सगळीकडेच मातंग समाजावरच मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे,त्यातील बहुतांश प्रकरणात जातीयवादी मानसिकतेच्या पोलिसांकडून विविध प्रकरणात अन्याय केला जातो,अशी अनेक उदाहरणे आहेत त्यातीलच एक उदाहरण म्हणजे वाठार मध्ये घडलेला प्रकार होय,प्रकाश दबडे मारहाण प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल कुमार पोतदार यांना निलंबीत करावे सदर प्रकरणातील आरोपींना त्वरित अटक करावी अशी मागणी करीत आज बंडखोर सेना पक्षाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांच्या नेतृत्वाखाली वडगाव पोलिस ठाण्या समोर निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी आक्रमक घोषणांनी पोलिस ठाण्याचा परिसर दणाणून सोडला....रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा रूपाताई वायदंडे यांनी आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला.
बंडखोर सेना पक्षाचे अध्यक्ष शिवाजीराव आवळे म्हणाले की,वाठार तर्फ वडगाव ता.हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील मातंग समाजातील प्रकाश श्रीपती दबडे वय वर्षे ६० हे आपला चारितार्थ चालविण्यासाठी वाठार मधीलच एका देशी दारू दुकानात ग्लास पुसण्याचे व पाणी भरण्याचे काम करतात असे असताना मंगळवार दि.१३/५/२०२५ रोजी दुपारी ४ ते सव्वाचार वाजताच्या दरम्यान सदर दारू दुकानातील मॅनेजर मिलिंद घोलप व आणखी एक अनोळखी व्यक्ती या दोघांनी मिळून श्री.प्रकाश दबडे यांना किरकोळ कारणावरून बेदम मारहान केली ज्या मध्ये त्यांच्या डाव्या पायाचे व हाताचे हाड फॅक्चर झाले आहे,सध्या त्यांच्यावर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय कोल्हापूर येथे उपचार सुरु असून दि.१९ मे २०२५ रोजीच त्यांना गंभीर दुखापत झाली आहे आणि त्यांचे ऑपरेशन करावे लागेल असा शेरा संबधित सीपीआरच्या डॉक्टरांनी मारला असताना जातीयवादी तपासी अंमलदार कुमार पोतदार यांनी तातडीने अर्ज करून मेडिकल सर्टिफिकेट मागविणे गरजेचे असताना आरोपीला सहकार्य करण्याच्या हेतूने हलगर्जीपणा करीत तब्बल नऊ दिवस होऊन देखील हॉस्पिटलकडे मेडिकल सर्टिफिकेट मागणी अर्ज केला नाही.मात्र आम्ही बंडखोर सेना पक्षाच्या माध्यमातून दि.२९ मे २०२५ रोजी सदर वडगाव पोलिस ठाण्या मध्ये जाऊन रीतसर निवेदन दिल्या नंतर मग तपासी अंमलदार पोलिस हेड कॉन्स्टेबल कुमार पोतदार यांनी मेडिकल सर्टिफिकेट मागणी अर्ज दिला तो पर्यंत अर्ज दिला नव्हता तो इतक्या दिवस का दिला नाही हा आमचा सवाल आहे...
त्याच बरोबर सदर मारहाण ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणचा पंचनामा पोतदार यांनी केला मात्र सिसिटीव्ही फुटेज मध्ये मारहाण करण्यासाठी जी फायबरची काठी संबंधित आरोपीने वापरली आहे ती जप्तच केली नाही.मात्र आम्ही बंडखोर सेना पक्षाच्या माध्यमातून दि..२९ मे २०२५ रोजी सदर वडगाव पोलिस ठाण्या मध्ये जाऊन रीतसर निवेदन दिल्या नंतर मग तपासी अंमलदार पोलिस हेड कॉन्स्टेबल कुमार पोतदार यांनी पुन्हा पंचनामा करून ती काठी जप्त केली हे असे का असा आमचा सवाल आहे...मॅनेजरचे नाव फिर्यादीने घेतलेले असताना फिर्यादी काय सांगतोय त्याला काय कळतंय अशी भाषा कुमार पोतदार यांनी कार्यकर्त्यां समोर वापरली...
सदर गुन्हा घडलेच्या ठिकाणचे संपूर्ण सिसिटीव्ही फुटेजची मागणी केली मात्र पोतदार यांनी संपूर्ण ओरिजनल फुटेज न घेता दारू दुकानातील कॅप्युटर वरून मोबाईलने शूटिंग करून फक्त एक ते दोन मिनिटांचे फुटेज घेतले व तेच कार्यकर्त्यांना दाखवून त्यांची दिशाभूल केली...
मात्र आम्हाला बाहेरील व आतीलहि फुटेज बघायचे आहेत अशी कार्यकर्त्यांनी मागणी केली तेंव्हा मला दुसरे काही काम नाही का ? तुम्हाला गरज असेल तर तुम्ही बघा जावा अशी भाषा कुमार पोतदार यांनी केली...
त्यामुळे पोतदार हे सरळ सरळ आरोपींना सहकार्य करीत आहेत हे आमच्या लक्षात आल्या नंतर त्यांच्या कडील तपास काढून घ्यावा अशी मागणी आम्ही पोलिस निरीक्षक विलास भोसले यांच्याकडे निवेदना द्वारे केली मात्र तरी देखील त्यांच्या कडील तपास काढून घेण्याबाबत श्रीयुत भोसले यांनी कोणतीही तसदी घेतली नाही त्यामुळे पोलिस निरीक्षक विलास भोसलेही तितकेच दोषी आणि कर्तव्यात कसूर करणारे आहेत असं आमचं मत आहे.असे आवळे म्हणाले...
शेवटचा मुद्दा असा की,गुन्हा घडला तारीख २९ मे २०२५ या संपूर्ण विषया बाबत निवेदन देऊन आरोपींना अटक करण्याची मागणी केली ती तारीख २९ मे २०२५ व त्यातील दोन पैकी एक आरोपी अटक केली आहे असं पोलिस सांगत आहेत ती तारीख २ जून २०२५ अशी आहे, म्हणजेच एकूणच या विषयात पोलिसांनी आरोपीला पाठीशी घालण्याचा व प्रकरण दाबण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला दिसून येत आहे व कर्तव्यात कसूर केलेली आहे...
त्यामुळे मातंग समाजातील श्री.प्रकाश दबडे यांना झालेल्या बेदम मारहाण प्रकरणाचा आम्ही बंडखोर सेना पक्षाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करीत असून आज वडगाव पोलीस स्टेशन समोर छेडलेल्या निषेध आंदोलनाच्या माध्यमातून पुढील मागण्या करीत आहोत...
मागण्या -
१)मातंग समाजातील प्रकाश दबडे यांना बेदम मारहाण करणाऱ्या आरोपींवर ३२६ कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करून आरोपींना अटक करण्यात यावी..
२) सदर प्रकरणात कर्तव्यात कसूर करणाऱ्या जातीयवादी मानसिकतेच्या पोलीस कॉन्स्टेबल कुमार पोतदार यांना सेवेतून बडतर्फ करून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी...
३) सदर घटनेकडे लक्ष न देता जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या व पोतदार यांच्याकडील तपास काढून घ्यावा अशी मागणी करून देखील त्या गोष्ठीकडे दुर्लक्ष करणाऱ्या व कर्तव्यात कसूर करणाऱ्या तत्कालीन पोलीस निरीक्षक श्री.विलास भोसले यांची विभागीय चौकशी करण्यात यावी...
४)गुन्हेगारी व मारहाणीला प्रोत्साहन देणारे सदर गुन्हा घडल्या ठिकाणचे देशी दारू दुकान बंद करण्यात यावे...
सदर मागण्या येत्या तीन दिवसात पूर्ण न झाल्यास शनिवार दि.7 जून रोजी कोल्हापूर जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या कार्यालयाला घेरावा घालण्याचा इशारा यावेळी आवळे यांनी दिला आहे...
या आंदोलनाचे निवेदन नूतन पोलिस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी स्वीकारले यावेळी पोतदार यांच्या बाबतचा अहवाल चोवीस तासात पाठविण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले...
या आंदोलनात आरपीआयच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा रूपाताई वायदंडे,बंडखोर सेना पक्षाचे युवक प्रदेश अध्यक्ष अमोल भोसले,बंडखोर सेना पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दयानंद आवळे,पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस सर्जेराव कार्वेकर,नागनाथ देसाई,शशिकांत वायदंडे,विजय लोखंडे,आलेश नांगरे,सुरेश आवळे,अभिषेक भंडारे,राहुल देडे,अजय साळवे,विनोद हेगडे,विशाल हेगडे,आनोष खुडे,प्रवीण तिवडे,दत्तात्रय भोसले,सचिन कांबळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..
