महाराष्ट्र वेदभुमी

गोफण गावात वादळी पावसामुळे झाड पडुन घराचे नुकसान , सुदैवाने जीवितहानी टळली


प्रतिनिधी  :- सत्यप्रसाद आडाव चणेरा : रोह्यात काल रात्री वादळी वाऱ्यासह अकराच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडला . या पावसामुळे घरांचे नुकसान झाले . चणेरा विभागातील  पांडुरंग महादेव कोळी  रा . गोफण घर क्रमांक ११३ यांच्या घरावर मला मोठा झाड पडल्यामुळे घराचे नुकसान झाले . व गावात इतर आठ घरांचे देखील किरकोल नुकसान झालेला आहे तरी नुकसान झालेल्या घरांचे पंचनामा तलाठी व मंडळ अधिकारी यांनी केलेला आहे.  त्यामुळे शासनाने  लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी  अशी मागणी  नागरिकांनी  केली आहे... 

      या घरांमध्ये अल्केश्वर महतो हे  भाडोत्री राहत होते तसेच त्यांच्यासोबत त्यांची पत्नी व दोन मुलं सुद्धा राहत होती . परंतु भाडोत्री अल्पेश्वर महतो हे कामानिमित्त बाहेर गेले होते व घरामध्ये त्यांची  दोन मुलं व  पत्नी घरामध्ये  होती...  राञी पावने बारा वाजता मुसळधार पाऊस व जोरात  वारा  सुटला होता अशात एक जोरात झाड पडल्याचा आवाज येतात घरातील मागच्या दाराने घरात राहणारी इतरमंडळी  सुरक्षित स्थळी पळाल्याने जिवीतहानी टळली....

         दरम्यान गोफण  गावातील पांडुरंग महादेव कोळी यांच्या घरावर रात्री धूम चक्री पावसामुळे मला मोठा झाड पडला या झाडामुळे घरावरील दहा फुटी १२ पत्रे , २० फुटी चार पाईप  व इतर किरकोळ नुकसान झाले आहे .  या  नुकसान झालेल्या  घराचा  पंचनामा चणेरा मंडळ अधिकारी प्रकाश मोकल, शेडसई सजा तलाठी प्रभारी नंदकुमार पाटील , शिडसई सरपंच  कल्याणी मढवी त्यांच्या समक्ष नुकसान झालेल्या घरांचा पंचनामा करण्यात आला  . तर हा घरांचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर केला जाईल असे तलाठी नंदकुमार पाटील यांनी सांगितले ...

Post a Comment

Previous Post Next Post