महाराष्ट्र वेदभुमी

आई, येते मी : एअर होस्टेल मैथिली मोरेश्वर पाटील



कांतीलाल पाटील : महाराष्ट्र वेधभुमी 

 न्हावा पनवेल, दि.१७ : अहमदाबाद गुजरात येथे झालेल्या विमान अपघातात, दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्या पनवेल तालुक्यातील न्हावा गावातील सुकन्या एअर होस्टेल मैथिली मोरेश्वर पाटील हिच्या पार्थिव मंगळवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार  करण्यात आले...  या घटनेमुळे संपूर्ण न्हावा गावावर आणि नवी मुंबईत शोकाकाला पसरली आहे. अंत्यसंस्कारासाठी उरणचे आमदार महेश बालदी आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते... तसेच न्हावा गावतील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते... मैथिली पाटील हिला सर्वांनी श्रद्धांजली वाहिली गुरुवारी 12 जून 2025 रोजी अहमदाबाद गुजरात वरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा अपघात होऊन 274 माणसांचा दुर्दैवी अंत झाला... या मृतामध्ये मैथिली पाटील हिचा पण समावेश होता... मैथिली पाटील ही गेल्या दोन वर्षापासून हवाई सुंदरी म्हणून कार्यरत होती... अत्यंत प्रतिकूल परीस्थित तीने हवाई सुंदरी होण्याचे स्वप्न पूर्ण केले होते... तिच्या या यशामुळे अनेकांना तिची प्रेरणा मिळाली होती... विमान अपघाताची बातमी कळताच तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला... मैथिलीचा पार्थिवसाठी डीएनए चाचणी करावी लागली... मंगळवारी सकाळी तिच्या पार्थिवा वर अंत्यसंस्कार करण्यात आले... या दुर्दैवी घटनेमुळे मैथिलीच्या कुटुंबावर दुखःचा डोंगर कोसळला आहे... संपूर्ण गाव शोकाकुल आहे... 

Post a Comment

Previous Post Next Post