वाहन चालकांसाठी दंड तपासणी व भरण्याची सुविधा उपलब्ध
कांतीलाल पाटील : महाराष्ट्र वेदभुमी वृत्तपत्र सेवा
खारघर, नवी मुंबई, २२ : वाहन चालकाने नियमाचे उल्लंघन केल्यानंतर त्यांना ऑनलाईन दंड आकारला जातो... तो आकारलेला दंड भरायचा कुठे माहिती नसल्यामुळे वाहन चालक चालकांचा वेळ वाया जात होता ही बाब लक्षात घेऊन खारघर उड्डाणपुला खालील मंकी पॉईंट येथील वाहतूक चौकी येथे वाहनचालकांसाठी दंड तपासणी व भरण्याची सुविधा खारघर वाहतूक पोलीस शाखेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे... याठिकाणी वाहन चालक आपल्या विरोधातील प्रलंबित दंड तपासू शकतात तसेच तिथेच दंडाची रक्कम भरू शकतात...
वाहतूक पोलिसांकडून वाहन चालकांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे वाहनचालकांना पोलीस ठाणे किंवा इतर कार्यालयात जावे न लागता थेट चौकीवरच आवश्यक ती कारवाई पूर्ण करता येणार आहे. यामुळे वेळेची बचत होणार असून वाहतूक व्यवस्थेत पारदर्शकता आणि शिस्त वाढण्यास मदत होईल या राबवत असलेल्या मोहिमेचे वाहन चालकांनी खारघर वाहतूक शाखेचे कौतुक केले आहे...
