महाराष्ट्र वेदभुमी

जागतिक योग दिवस उत्साहात साजरा

सचिन चौरसिया प्रतिनिधी 

रामटेक:- स्वराज विहार कॉलनी वाथोडा, नागपूर येथील एनआयटी गार्डनमध्ये रोजी दि. २१ जून  रोजी सकाळी ७ वाजता आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला... सदरहू कार्यक्रमाकरिता स्वराज विहार कॉलनीतील सर्व परिवार व योग साधकांनी भाग घेतला तसेच संकल्प नगर योगाभ्यासी मंडळ व शक्तिमाता नगर योग मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने साधकांनी  सुद्धा हजेरी लावून योगा दिवस  योगाचार्य मधुकर पराते यांचे मार्गदर्शन खाली उत्साहात साजरा करण्यात आला... जनार्दन स्वामी यांच्या प्रतिमेला योगाचार्य मधुकर पराते व विजयसिंग तोमर यांनी हार अर्पण करून व इतर योग शिक्षक यांचे कडून दीप प्रज्वलन करण्यात आले... व त्यानंतर योग अभ्यास घेण्यात आला... उपरोक्त कार्यक्रमाला जवळपास ११० साधकांनी भाग घेतला... योगाचार्य  मधुकर पराते, मिराताई हटवार, धनराज थोटे, राजेश श्रावणे, जितेंद्र खंडेलवाल, भागवत तिबुडे, विनोद फेद्देवार या योग शिक्षकांचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम चे संचालन प्रकाश माथने  व आभार प्रदर्शन जितेंद्र खंडेलवाल यांनी केले...

Post a Comment

Previous Post Next Post