सचिन चौरसिया रामटेक
रामटेक :- अवैध अग्निशस्त्र जवळ बाळगणाऱ्या एका तरुणांला स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रामटेक पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना कांद्री बसस्टॉप येथे शुक्रवारी (दि.२०) अटक करण्यात आली... त्याच्याकडून एक अग्निशस्त्र, दोन जीवंत काडतुसे, मोबाईल असा एकुण ६० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रजत राजेश दोंदलकर असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर रामटेक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे... घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत कांद्री बसस्टॉप येथील व्यक्तीची कसून चौकशी केली. रजत राजेश दोंदलकर (२४, रा. कांद्री माइन, प्रेमनगर, वॉर्ड क्रमांक ५, मनसर, ता. रामटेक), असे त्याने नाव सांगितले... पोलिसांनी पंचांसमक्ष रजतची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक लोखंडी देशी बनावटीचे अग्निशस्त्र (माउजर) व दोन जिवंत काडतुसे आढळून आली... शस्त्राचा परवाना विचारला असता त्याच्याकडे कुठलाही परवाना नव्हता... हे अग्निशस्त्र (माउजर) त्याने वर्षभरापूर्वी शाहरुख उर्फ सौरभ राजपूत (रा. बैतुल, मध्यप्रदेश) याच्याकडून विकत घेतल्याची माहिती दिली... या प्रकरणी आरोपी रजत राजेश दोंदलकर व पसार शाहरुख उर्फ सौरभ राजपूत याच्याविरुद्ध रामटेक पोलीस ठाण्यात कलम ३, ५, २५ शस्त्र अधिनियम १९५९ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे... पोलिसांनी आरोपी रजत दोंदलकरला अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे...
