महाराष्ट्र वेदभुमी

मुनवलीत रेवस विभागात पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली, युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू,

रेवस विभागात ऐन पावसाळ्यात भीषण पाणी टंचाई, तर ग्रामस्थांचे पाण्यावाचून हाल

एमआयडीसी अंतर्गत रेवस पाणीपुरवठा विभागाकडून येणाऱ्या पाईपलाईन मध्ये बिघाड,

सरपंच पिंट्या गायकवाड यांनी बिघाड झालेल्या ठिकाणची केली पाहणी, पाणीपुरवठा विभागाकडे केली तक्रार,

सोगाव -: अब्दुल सोगावकर : अलिबाग तालुक्यातील मुनवली येथे रेवस पाणीपुरवठा योजनेच्या पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गेल्या पाच दिवसांपूर्वी फुटली असून ती दुरुस्ती करण्याचे काम कासव गतीने सुरू असल्याने तब्बल३२ गावांचा पाणीपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांचे ऐन पावसाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याबाबत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी राजकीय डावपेच खेळण्यात व्यस्त असल्याने या कडे कोणाचेच लक्ष नसल्याने जगण्यासाठी महत्वाचे असणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी कोणीही गांभीर्याने लक्ष देत नसल्याने ग्रामस्थ संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहे... 

  आपल्या किहीम ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना पाणीपुरवठा बंद असल्याने सरपंच पिंट्या गायकवाड यांनी ऐन पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करीत असल्याने किहीम हद्दीतील ग्रामस्थांना मोठा दिलासा दिला आहे, मात्र किहीम विभाग वगळता अन्य गावांत भीषण पाणीटंचाई ला सामोरे जावे लागत आहे. ऐन पावसाळ्यात विकतचे पाणी घेऊन ग्रामस्थांना आर्थिक नुकसान सहन करावा लागत आहे. सरपंच पिंट्या गायकवाड यांनी मुनवली येथे प्रत्यक्ष जलवाहिनी फुटलेल्या ठिकाणी भेट देऊन जलवाहिनी दुरुस्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे व पाणीपुरवठा योजना राबविली जात असलेल्या पंचायत समितीचे अधिकारी श्री. वेंगुर्लेकर सातत्याने पाठपुरावा करून पाणीपुरवठा सुरळीत चालू करावा, अशी मागणी केली आहे...

कोट - मुनवली येथे दोन ठिकाणी सोमवारी जलवाहिनी फुटली होती, मात्र या जलवाहिनीच्या दुरुस्तीकरीता लागणारे ज्वाइंट(क्लॅम्प) पाईप उपलब्ध नव्हते, त्यामुळे लागणारे ज्वाइंटची ऑर्डर संबधीत कंपनीला दिली होती, पण ती यायला वेळ लागला, शनिवारी ज्वाइंट मिळाला आहे, तरी आज रविवारी काम पूर्ण करून लवकरच पाणीपुरवठा सुरळीत चालू करणार आहोत...

श्री. वेंगुर्लेकर - रेवस पाणीपुरवठा योजनेचे अधिकारी - अलिबाग,

फोटो लाईन : मुनवली येथे जलवाहिनी फुटलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी करतांना किहीम सरपंच पिंट्या गायकवाड व उपस्थित रेवस पाणीपुरवठा योजनेचे कर्मचारी,

Post a Comment

Previous Post Next Post