महाराष्ट्र वेदभुमी

सर्पमित्र दिनेश शिर्के यांनी ८ फुटी अजगराला रेस्क्यू करून दिले जिवदान .....


प्रतिनिधी - सत्यप्रसाद आडाव चणेरा:- दिनेश शिर्के या सर्पमित्राने खांबेरे येथील शेतकरी गणेश भगत यांच्या गावरान पोल्ट्री फार्म मध्ये ८ फुटी लांबीचा एक भारतीय अजगर जातीचा साप पोल्टी फार्म मधील एक कोंबडी फस्त करुन बसल्याचे भगत यांच्या निदर्शनास आले... त्यांनी त्याला न मारता किंव्हा कोणत्याही दुखापत न करता वाचविण्यातशचा निर्णय घेऊन अमित निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा येथील सर्पमित्र तसेच निसर्ग व वन्यजीव  संरक्षक दिनेश शिर्के यांना फोन केला शिर्के यांनी क्षणाचाही विलंब नकरता खांबेरे येथे पोहचून मोठ्या शिताफीने ह्या अजगरास रेस्क्यू केले असल्याने सर्पमित्र शिर्के यांच्या या कामगिरी बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे...

 रेस्क्यू केलेल्या अजगरास रोहा उपवनसंरक्षक डॉ. शैलेश जाधव सहाय्यक वनसरंक्षक रोहीत चौबे यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल आर. जी. गायकवाड , वनरक्षक अक्षय चौगुले आणि वाहनचालक राजेश लोखंडे यांच्या उपस्थितीत नैसर्गिक आधिवासात यशस्वी रीत्या सोडण्यात आले...

       प्रसंगी शिर्के म्हणाले की ज्याप्रमाणे माणूस हा ह्या सुंदर निसर्गाचा घटक आहे... त्याप्रमाणे हे मुके जीव , सरीसर्प हे देखील ह्या निसर्गाचे घटक आहेत... त्यांचेही संरक्षण आणि जतन केले पाहिजे . त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे.... शेवटी त्यांनी " जगा आणि जगू द्या " असा मानवतावादी विचार मांडला... तर कोणत्याही दुखापत न करता अजगराला जिवदान देऊन ख-या अर्थाने वन्यजीव अभ्यासक मारुती चित्तमपली यांना भावपूर्ण आदरांजली वाहली आहे असे गणेश भगत म्हणाले...

    यावेळी दिपक गोरीवले , संदिप जंगम , चंद्रकांत शिदे , महादेव नलावडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post