सलग तीन वर्ष सातत्यपूर्ण उपक्रम; ग्रामसेवक दत्तात्रय सावंत यांचा पुढाकार...
ग्रामपंचायत हद्दीतील शेकडो महिलांचा समावेश; योगा प्रशिक्षक विभा चोरगे यांचे कार्यक्रमाला मार्गदर्शन...
संपूर्ण जगामध्ये 21 जून हा दिवस योगा दिन म्हणून साजरा केला जातो. शारीरिक आणि मानसिक आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो या दिवसाच्या माध्यमातून योगाचे फायदे सांगितले जातात...
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात ग्रुप ग्रामपंचायत वरसे ही जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि बलाढ्य ग्रामपंचायत मानली जाते या ग्रामपंचायतीमध्ये गेल्या दोन वर्षापासून जागतिक योग दिवस हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो... त्याचप्रमाणे ग्रुप ग्रामपंचायतचे ग्रामसेवक श्री दत्तात्रय सावंत यांच्या पुढाकारातून आणि ग्रामपंचायतचे सरपंच श्री रामा देवाजी म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक योगा दिवस साजरा करण्यात आला...
यावेळी ग्रामपंचायत हद्दीतील शेकडो महिलांनी सहभाग दर्शविला पाहायला मिळाला जिल्ह्यातील प्रसिद्ध योगा प्रशिक्षक विभा चोरगे यांनी योगा दिनानिमित्त उपस्थित महिलांना योग्य प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन करण्यात आले... यावेळी ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य श्री शांतिशील तांबे, सदस्य मनोहर उर्फ मामा सुर्वे सदस्य उतेश कांबळे आदी नागरिक उपस्थित होते...
