सोगाव - अब्दुल सोगावकर : मुसळधार बरसत असलेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला असून नदी नाल्यांनी आपली धोक्याची पातळी ओलांडली आहे, ठिकठिकाणी दरड कोसळून दुर्घटना होत आहेत... याबाबत खबरदारी म्हणून अलिबाग तालुक्यातील मापगाव ग्रामपंचायत हद्दीतील सोगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच वसीम कुर यांनी दरडग्रस्त प्रवणक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या सोगाव आदिवासीवाडी येथे गुरुवार दि. १९ जून २०२५ रोजी जाऊन त्याठिकाणी राहणाऱ्या सर्व बांधवांना अतिवृष्टीमुळे घरांच्या झालेल्या पडझडीची पाहणी करत त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी व पाहणी करून मोठा दिलासा दिला आहे...
वसीम कुर यांचे आदिवासी समाजासोबत एक अनोखे व सौहार्दाचे नाते आहे, प्रत्येक अडीअडचणीमध्ये तसेच ऊन, वारा, पाऊस असो ते सहकार्य करण्यात नेहमीच पुढे असतात, नुकतेच मंगळवार व बुधवार रोजी आलेल्या मुसळधार पावसामुळे सगळीकडे दाणादाण उडाली आहे... आपल्या भागातील सोगाव येथील आदिवासी बांधवांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी त्यांनी गुरुवार दि. १९ जून रोजी भरपावसात त्यांच्या वाडीवस्तीवर जाऊन पाहणी करून दिलासा दिला, यावेळी सोगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी उपसरपंच वसीम कुर यांच्यासोबत त्यांचे सहकारी माहीद कुर, रमीज कुर, साकीब कुर, आफ्फान कुर, अनिकेत कांबळे, कृष्णा नाईक व इतर मित्रपरिवार यांच्यासह आदिवासी महिला व पुरुष बांधव उपस्थित होते, त्यावेळी त्यांनी सांगितले की, ग्रामपंचायत प्रशासनाबरोबर संपर्क साधून सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले... तसेच वसीम कुर यांनी दरड कोसळून कोणत्याही प्रकारची जीवितहानी व वित्तहानी होऊ नये म्हणून ग्रामपंचायत मार्फत बांधण्यात आलेल्या तात्पुरत्या निवाराशेडमध्ये जाण्याच्या त्यांना सूचना देत सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे... याबाबत वसीम कुर यांनी वाडीवर येऊन आमची आस्थेवाईकपणे चौकशी करून आम्हाला दिला त्याबद्दल आदिवासी बांधवांनी आभार मानले आहे...
फोटो लाईन : सोगाव आदिवासी वाडी येथे मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्यामुळे बांधवांची आस्थेवाईकपणे चौकशी करताना सामाजिक कार्यकर्ते तथा मापगावचे माजी उपसरपंच वसीम कुर व इतर,
