मुंबई प्रतिनीधी : (सतिश वि.पाटील )
सावरकर रुग्णालयाची दुरवस्था मुलुंड अपुऱ्या सुविधा अभावी रुग्णाची गैरसोय सायन ,राजावाडी रूग्णालयात जाण्याचा सल्ला मुलुंड मुंबई रूग्णालय पण चांगले वैद्यकीय उपचार नाहीत... जागा आहे पण त्याचा योग्य वापर नाही.त्याच बरोबर तज्ञ डाॅक्टर, वैद्यकीय सामग्रीचा अभाव असल्याने मुलुंड मधल्या विर सावरकर रुग्णालयाची दुरावस्था झाली आहे...त्यामुळे अनेक रूग्णांना थेट सायन किंवा राजावाडी रूग्णालयात गाठावे लागते...सावरकर रुग्णालयाच्या दुरावस्थेकडे मा.खासदार संजय पाटील यांनी मुबंई उपनगर जिल्हय़ाचे पालक मंत्री अशिष शेलार याचे पत्राव्दारे लक्ष वेधले.या रूग्णालयात सर्व सुखसोई पुरवाव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे...
आधुनिक सुखसुविधांची गरज
वैद्यकीय उपचारासाठी अधुनिक सामुग्री द्यावी. एमआरआय,सिटीस्कॅन, डायलेसिस सेंटर , नवजात अर्भकांसाठी एनआयसीयू युनिट तयार करून रिकाम्या जागेचा यासाठी वापर करावा.अशी मागणी खासदार संजय पाटील पत्राव्दारे यांनी पालक मंत्री अशिष शेलार याच्या कडे केली आहे...
नुतनीकरण करून ही म्हणावा तसा लाभ नाही...
मुलुंड पूर्वेला पाच मजली वीर सावरकर रूग्णालयात आहे... म्हाडा वसाहत, पीएमजीपी , टाटा काॅलनी, पत्रा चाळ, दीनदयाळ नगर, गव्हाणपाडा, मिठागर रोड, नवघर पाडा, नानेपाडा, निलमनगर या भागात महापालिकेचे एकमेव रूग्णालयात आहे...
या रूग्णालयात गरोदर महीलांसाठी विषेश वार्ड असल्याने प्रसूतीसाठी महीला येतात मात्र येथे कर्मचाऱी वर्ग अपुरा असल्याने रूग्णांना योग्य उपचार उपलब्ध होत नाहीत...
पाच मजल्यावर अनेक खोल्या रिकाम्या असून त्याचा योग्य वापर होत नाही...या रूग्णालयात तज्ञ डाॅक्टर नसल्याने गंभीर आजारी व अपघात ग्रस्त रूग्णांना उपचारार्थ राजावाडी ,सायन रूग्णालय घेऊन जाण्याचा सल्ला दिला जातो... अशी नागरिकांची तक्रार आहे. तसेच मुलुंड पश्चिमेचे महापालिका रूग्णालय ही बरेच वर्ष नुतनीकरणासाठी बंद आहे मुलुंडकरांना सायन, वाडिया,केईएम शिवाय पर्याय नाही...
अलिकडेच कोट्यावधी रूपये खर्च करून सावरकर रुग्णालयाचे नुतनीकरण करण्यात आले पण सुविधांचा अभाव आहे...