जेएनपीटीकडे जाणाऱ्या कंटेनरमधील माल चोरीला गेला.
कांतीलाल पाटील : महाराष्ट्र वेदभूमी
पनवेल, दि.२८ : पनवेलजवळील नवकार लॉजिस्टकमधून कंटेनर घेऊन ट्रेलर चालक जेएनपीटीकडे निघाला होता... त्या कंटेनरमधून परदेशात निर्यात करण्यासाठी उच्च प्रतीची हळद, तांदूळ, लाल मिर्ची, काबुले चणे असा १६ लाख २ हजार ६७५ रुपयांचा माल होता...
नवकार लॉजिस्टिकमधून कंटेनर घेऊन निघालेल्या चालकाने स्थळ मार्गिका दर्शविणारी जीपीएस यंत्रणा चालकाने लबाडीने बंद करून ठेवली होती...
त्या दरम्यान, मधल्यामध्ये हा माल त्यांनी लंपास केल्याचा चालकासह त्याच्या अन्य साथीदारांबरोबर आरोप ठेवण्यात आला आहे... खांदा कॉलनीत सेक्टर ६ मधील निल लेक गृहसंकुलात राहणारे पंढरीनाथ सहानु गांजवे यांनी उरण पोलिस ठाण्यात प्रताप रोशन सिंग, सतीश सतेंद्र पटेल, राम सागर, राम दखन यादव, वीरेंद्र कन्हेया लाल आणि राजेश कुमार करण सिंग आदी आरोपींविरोधात फिर्यादी गांजवे यांनी अर्ज केला होता...
त्या अनुषंगाने उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजय राऊत यांनी गुन्हा नोंदविला आहे...सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खडे हे अधिक तपास करीत आहेत. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही...