महाराष्ट्र वेदभुमी

मुंबई गोवा महामार्गावर खांब नजीक एसटी बसवर कार धडकली, दोनजण जखमी...

वार्ताहर- श्याम लोखंडे रोहा:  मुंबई गोवा महामार्गावर खांब नजीक रविवारी १ जून रोजी कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने समोरील एसटी बसवर कार धडकल्याने दुर्दैवी अपघात घडल्याची घटना घडली असून यात कारमधील चालक व त्याची पत्नी हे दोघेजण गंभीर जखमी झाले असून कारचा देखील मोठ्या प्राणावर नुकसान झाले आहे...

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गवर रविवारी सायंकाळी साडेपाच च्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती कोलाड पोलिसांनी दिली आहे तर एसटी बस क्रमांक एम एच ०८ ए पी ५८२५ वरील चालक संतोष काशीराम बुधकर वय वर्षे (४०) हे ही बस प्रवासी घेऊन मुंबई च्या दिशेने कोलाड महाड दिशेकडे येत होते तर संतोष मेढेकर हे आपल्या ताब्यातील कार क्रमांक एम एच ०६ बी यू ९९३६ सह पत्नी मुंबई कडे जात असताना विरोधि दिशेनं जात असताना कारवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या परिस्थिकडे दुर्लक्ष केले व समोरील एसटी बसवर धडकल्याने संतोष मेढेकर व त्यांच्या पत्नी कविता मेढेकर गंभीर जखमीं झाले आहेत...

घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली असून अधिक तपास पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली येथील तपासिक अंमलदार करत असल्याची माहिती मिळाली आहे...

Post a Comment

Previous Post Next Post