पुगांव रोहा(नंदकुमार कळमकर) : आरोग्य केंद्र इंदापूर अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदीर रातवड अंतर्गत माध्यमिक विद्यालय रातवड येथे नुकताच हिवताप जनजागृती करण्यात आली... सदरवेळी हिवताप अंतर्गत चित्रकला स्पर्धा घेण्यात आली... मुलांनी सुंदर चित्र काढले... हिवताप आजारावरील आरोग्य शिक्षण देते वेळी येता कणकण तापाची करा तपासणी रक्ताची... गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा... तसेच कोरडा दिवस पाळणे परिसर स्वच्छ ठेवणे... फुटलेली टायर, रिकामे डबे नारळ करवंटी, बादली, पाणी साचू देऊ नये... स्वच्छता राखावी परिसर स्वच्छ ठेवणे...आरोग्य शिक्षण व मार्गदर्शन करण्यात आले...
सदर वेळी आयुष्यमान आरोग्य मंदीर रातवड येथील मा. सी. एच. ओ. चाटे साहेब आरोग्य सेविका सी. एन मोरे तसेच आरोग्य सेवक श्री. सुधीर गणपत खैरे आरोग्य सेवक रातवड यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले... यावेळी माध्यमिक विद्यालय रातवडचे मुख्याध्यापक संतोष कदम, डॉ. शारदा निवाते मॅडम सौ.भारती कांबळे मॅडम, भगत सर, गरधे सर, गायकवाड सर, ऐत मॅडम, पालकर मॅडम, तसेच शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते...