मुंबई प्रतीनिधी ; (सतिश वि.पाटील )
अंमलबजावणी आधी सर्व संबंधितांशी चर्चा करणार
हिंदी भाषा शिकवण्याबाबतच्या निर्णयाबाबत सरकारने जपून पाऊल टाकण्याचे ठरवले असून सर्व संबंधितांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री बैठकीत स्पष्ट केले...
त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषा तज्ज्ञ, राजकीय नेते आणि इतरही सर्व संबंधितांशी चर्चा करुनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले... त्रिभाषा सूत्रासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी एक बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आणि शिक्षण विभागातील अधिकारी यावेळी उपस्थित होते...
त्रिभाषेबाबत शिक्षणतज्ज्ञ साहित्यिकांशी चर्चा केली जाईल असे ठरले आहे... मात्र, त्याच वेळी सरकारने विद्यार्थ्यांच्या अॅकेडेमिक क्रेडिटचे नुकसान कसे टाळता येईल याचा विचार होणार असल्याचेही स्पष्ट केले... शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे आता या विषयात सर्व संबंधितांशी चर्चा सुरु करणार असल्याचे समजते...
या विषयावर सांगोपांग चर्चा झाल्यानंतर सर्व राज्यांची स्थिती सर्वांसमोर मांडावी, नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत मराठी मुलांचे अॅकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटच्या अनुषंगाने नुकसान होऊ नये, यासह इतरही पर्यायांवर सर्वांसाठी समग्र सादरीकरण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला... मराठी भाषेचे अभ्यासक, साहित्यिक, राजकीय नेते यासह सर्व संबंधितांसमोर याचे सादरीकरण आणि सल्लामसलतीची प्रक्रिया राबविण्यात यावी, असे या बैठकीत निश्चित करण्यात आले...
मंत्री भुसे करणार प्रक्रियेला सुरुवात
यासंदर्भातील सल्लामसलतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असेही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले... त्यामुळे शालेय शिक्षणमंत्री भुसे हे आता पुढील सल्लामसलतीची प्रक्रिया प्रारंभ करणार आहेत...