महाराष्ट्र वेदभुमी

रोहा तालुक्यात युरिया खताचा तुटवडा, शेतकरी चिंतेत..

 

 पुगांव रोहा (नंदकुमार कळमकर): रोहा तालुक्यात खरीप हंगामातील पिकांसाठी १ हजार ७५ मे टन युरियासह विविध प्रकारच्या खताची आवश्यकता आहे... ऐन खरीप हंगामात रोहा तालुक्यात युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून करण्यात येत असुन युरिया खताच्या खरेदीसाठी विविध ठिकाणी धावपळ करून ही खत उपलब्ध होत नाही...

   इतिहासात प्रथमच मे महिन्याच्या ६ तारखेपासून अवकाळी पाऊस सुरु झाला तो मे महिन्याच्या शेवटपर्यंत सुरु राहिला नंतर तो १०  जुनपर्यत गायब झाला व हवामान खात्याने ही सांगितले होते की १० जुननंतर भाताची पेरणी करावी...नंतर शेतकऱ्यांनी ही दहा जुन नंतर पेरणी केली...व भाताची रोपे उगवण्यास सुरुवात झाली... भाताची रोपांची लवकर वाढ होण्यासाठी युरिया खताचा मारा केला जातो. परंतु युरिया खताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांना विविध ठिकाणी जाऊन धावाधाव करूनही खत उपलब्ध होत नाही...

       रायगड जिल्हा हा भाताचा कोठार म्हणून ओळखला जातो...त्याच जिल्ह्यातील रोहा तालुक्यात काही भागात उन्हाळी भात शेती केली जाते... ही भातशेती चांगली येऊन ही अवकाळी पावसाने उध्वस्त केली आणि या तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा नुकसानीचा सामना करावा लागला परंतु येथील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरणी केली..मात्र रोपे वाढीसाठी युरिया खताचा आवश्यकता आहे...युरिया खत सर्वात महत्वाचे नायट्रोजन युक्त खत असल्याने पिकांना नत्राची मात्रा तात्काळ लागू पडते... पिकांची वाढ जोमाने होते... पिकांना हिरवा गडद मिळतो... तसेच इतर रासायनिक खतापेक्षा युरिया खताची किंमत कमी असते... मात्र खत विक्रेत्यांकडे युरिया खत उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना रिकाम्या हाती परतावे लागत आहे... यामुळे युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला... असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post