शहानवाज मुकादम/रोहा :- रोहा तालुक्यातील चणेरा भागातील खुटल येथील विट्भट्टी वर काम करणारी २५ वर्षीय विवाहित महिला आपल्या १० व ७ वर्षाचे दोन लहान मुलांसोबत बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे...याबाबत पती दीपक चंदर वाघमारे याने रोहा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे...
तक्रारदार दीपक चंदर वाघमारे हा मूळचा राहणार मुरुड तालुक्यातील शीघ्रे नवीनवाडी येथील रहिवाशी असून तो आपल्या बायको व दोन मुलांसोबत रोहे तालुक्यातील चणेरा विभागातील खुटल येथील एका विटभट्टीवर मोलमजुरी म्हणून काम करत असे... दि.१३ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १२ वा. च्या सुमारास खुटल येथून राहत्या घरातून पत्नी राजेशी वाघमारे ( वय २५), विघ्नेश दीपक वाघमारे ( वय १० वर्ष ), योगेश दीपक वाघमारे ( वय ७ वर्ष ) हे तिघेजण बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे... गेली ४ महिने दोन मुलांसोबत पत्नी बेपत्ता असल्याची खबर रोहा पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे... पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एन एन मोरे पुढील तपास करित आहेत...
